Ind vs Aus 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया ९ फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही कसोटी मालिका जिंकून टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवायची संधी आहे.
या मालिकेसाठी भारतीय संघात असा एक स्टार खेळाडू आहे, जो टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकतो. हा खेळाडू कसोटी गोलंदाजीत महारथी आहे. कोणता आहे तो खेळाडू आणि त्याची आतापर्यंतची कामगिरी काय जाणून घेऊया.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताकडे स्टार फिरकी अष्टपैलू अक्षर पटेल आहे. त्याचा चेंडू समजणे फलंदाजांसाठी सोपे नाही आणि तो चेंडू फिरवण्यात माहिर आहे. त्याच्याकडे चांगलेच व्हेरिएशन आहे. त्यामुळे तो टीम इंडियासाठी या मालिकेत गेमचेंजर ठरू शकतो. याशिवाय तो खालच्या क्रमवारीत फलंदाजी देखील करू शकतो. अक्षरकडे वेगवान फलंदाजी करण्याची क्षमता आहे.
अक्षरची कसोटीतील कामगिरी
अक्षर पटेलने 2021 साली इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. अहमदाबाद येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने उत्कृष्ट गोलंदाची करत सर्वांना प्रभावित केले. या सामन्यात एकूण 11 विकेट घेऊन त्याने तीन दिवसांत सामना संपवला होता. अक्षर पटेलने आतापर्यंत भारतासाठी 8 कसोटी सामने खेळले आहेत. या आठ सामन्यात त्याने 47 बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच कसोटीत तो त्याच्या 50 विकेट्स पूर्ण करू शकतो.
भारताची गोलंदाजी मजबूत
ऑस्ट्रेलियाने 2004 पासून भारतात कसोटी मालिका जिंकलेली नाही. विदेशी संघांना भारतात फिरकी गोलंदाजी खेळताना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितत टीम इंडियाकडे रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलसारखे घातक फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाची मजबूत मानली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.