MCA : राज्यातील क्रिकेटपटूंसाठी 'एमसीए' चे अध्यक्ष Rohit Pawar यांनी दिली आनंदाची बातमी, म्हणाले...

आज आमदार राेहित पवार हे साेलापूरात आले हाेते.
Rohit Pawar
Rohit Pawarsaam tv

Rohit Pawar : महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट (Maharashtra Premier League) स्पर्धेतून प्रतिभावंत खेळाडू राज्याला मिळतात हे यापुर्वी दिसून आले आहे. ही स्पर्धा पुन्हा व्हावी अशी मागणी राज्यभरातून हाेत आहे. आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असाेसिएशनमधील (Maharashtra Cricket Association) सर्व सदस्य देखील त्यावर विचार करीत आहाेत. आगामी काळात खेळाडूंना निश्चिीतच आनंदाची बातमी देऊ असा विश्वास एमसीएचे अध्यक्ष राेहित पवार (rohit pawar) यांनी व्यक्त केला.

Rohit Pawar
Helmet Compulsion : सर्व सरकारी कार्यालयात हेल्मेट सक्ती; RTO ची स्वत:च्या कार्यालायापासून अंमलबजावणी

एमसीएच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार राेहित पवार हे राज्यातील सर्व जिल्ह्यातील क्रिकेट संघटनांच्या कार्यालयांना भेटी देताहेत. तेथे पवार हे खेळाडूंशी, संघटकांशी, प्रशिक्षकांशी स्थानिक क्रिकेटवर चर्चा करतात. तसेच विविध मैदानांवर जाऊन त्याची पाहणी करुन काेणत्या नव्या गाेष्टी करता येणे शक्य आहे त्याबाबत चाचपणी देखील करतात.

Rohit Pawar
MRF MoGrip FMSCI इंडियन नॅशनल रॅलीत तनिका शानभाग द्वितीय

सोलापुरातील (solapur) इंदिरा गांधी स्टेडियमवर रोहित पवारांनी आज क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना क्रिकेट आणि खेळाडूंच्या खेळाचा दर्जा उंचाविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. पवार म्हणाले सोलापूर जिल्हा असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या इंदिरा गांधी स्टेडियमवर जास्तीत जास्त सामने खेळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

मुलींच्यासाठी सरावासाठी देखील एमसीए सकारात्मक विचार करीत आहे. टॅलेंट हंट संकल्पना राबवणार आहाेत आणि खेळाडूंना पुढे आणण्यासाठी व्यासपीठ तयार करणार आहाेत असेही पवार यांनी नमूद केले. दरम्यान एमपीएलच्या बाबतीत एमसीए सकारात्मक भूमिकेत आहे. लवकरच एक आनंदाची बातमी खेळाडूंना (players) मिळेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com