Yuzvendra Chahal Latest News, Rajasthan royals Vs KKR News Updates, IPL 2022 News Updates saam tv
क्रीडा

'KKR' चा उडवला धुव्वा; एकाच ओव्हरमध्ये चहलने घेतल्या ४ विकेट्स, पत्नीनं केला धमाल डान्स

नरेश शेंडे

मुंबई : आयपीएलच्या १५ व्या मोसमात (IPL 2022) एकाहून एक रंगतदार लढती पाहायला मिळत आहेत. दिग्गज अनुभवी खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळं सामने रंगतदार होत असून क्रिकेट चाहत्यांचंही मनोरंजन होत आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan royals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (kolkata knight Riders) यांच्यात सोमवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर अतीतटीचा सामना झाला. राजस्थानचा सलामीवीर फलंदाज जॉस बटलरने (Jos Buttler) आक्रमक फलंदाजी करत यंदाच्या हंगामात दुसरं शतक ठोकलं. त्याच्या या अप्रतिम कामगिरीमुळं राजस्थाननं ५ बाद २१७ धावा केल्या. त्यानंतर ११८ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी केकेआरनेही त्यांचा फलंदाजीचा जलवा दाखवला. केकेआर १७ व्या षटकामध्ये विजयाच्या जवळच असताना राजस्थानचा फिरंकी गोलंदाज युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) धडाकेबाज गोलंदाजी केली. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरला ८५ धावांवर बाद करत हॅट्रीक घेवून चार विकेट्स घेतल्या. चहलने केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळं त्याची पत्नी धनर्शी वर्मानं (Dhanashree Varma) स्टेडियमच्या गॅलरित उड्या मारत डान्स करुन त्याला प्रोत्साहन दिलं. तसंच राजस्थानच्या चहात्यांनीही टाळ्यांच्या गजर करत चहलवर स्तुतीसुमनं उधळली. (IPL 2022 News Updates)

आयपीएलमध्ये युजवेंद्र चहलची दमदार कामगिरी

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल धडाकेबाज गोलंदाजी करुन प्रतिस्पर्धी संघाच्या अनेक दिग्गज फलंदाजांना तंबुत पाठवलंय. आयपीएलच्या गेल्या काही हंगामामध्ये मोक्याच्या क्षणी विकेट्स घेवून चहलने आरसीबीलाही अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. यंदाच्या हंगामातही राजस्थान रॉयल्ससाठी त्याने दमदार कामगिरी केलीय. काल सोमवारी केकेआर विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये झालेल्या सामन्यात युजवेंद्र चहलने चार षटकांत ४० धावा देत पाच विकेट्स घेतल्या. यंदाच्या हंगामात त्याने सहा सामन्यांमध्ये एकूण १७ विकेट्स घेतल्या आहेत.

'या' भारतीय खेळाडूंनीही घेतलीय IPL मध्ये हॅट्रिक

आयपीएलच्या इतिहासात अनेक गोलंदाजांनी त्यांच्या उत्तम कामगिरीमुळं विकेट्सची हॅट्रिक घेण्याच्या लीस्टमध्ये आपलं नाव कोरलं आहे. यामध्ये लक्ष्मीपती बालाजी, अमित मिश्रा, युवराज सिंग, रोहित शर्मा, प्रविण कुमार, अजील चंडेला, प्रविण तांबे, अक्षर पटेल, जयदेव उनादकट, श्रेयस गोपाल आणि हर्षल पटेल या खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे अमित मिश्रानं तिनवेळा हॅट्रिक घेण्याची अप्रतिम कामगिरी केलीय.

धनश्री वर्माने यापूर्वीही केला होता डान्स

धनश्रीने भारतीय संघातील खेळाडू श्रेयस अय्यर सोबतही डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसंच नुकतंच तिने राजस्थानचा मधल्या फळीतील फलंदाज रियान परागसोबतही पांरपरिक 'बीहू डांस' करत ठुमके लावले होते. त्यानंतर धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करत 'खूप सुंदर आणि मजेशीर असमिया' असे कॅप्शनही दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT