'IPL' चा इतिहास पडद्यावर झळकणार; ललित मोदींवर येणार बायोपिक

Lalit Modi
Lalit Modisaam tv news
Published On

क्रिकेट आणि बॉलिवूडचं (Bollywood) नातं दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. यामागची कारणंही मोठी आहेत. क्रिकेटमध्ये चांगल्या वाईट गोष्टी नेहमी घडत असतात. क्रिकेटच्या सामन्यांमध्ये (cricket) सुरु असलेली सट्टेबाजी अनेकदा चव्हाट्यावर आली आहे. क्रिकेटमध्ये ज्या दिग्गज खेळाडूंच भरीव योगदान आहे त्यांच्यावरही बायोपिक (biopic) बनवलं आहे. तर एखाद्या घोटाळ्यात किंवा सट्टेबाजीमुळं क्रिकेटच्या मैदानातून कायमचं बाहेर पडलेल्या खेळाडूंवरही सिनेमा बनवण्यात आलाय. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (ms dhoni), क्रिकेटचा गॉड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (sachin Tendulkar), मोहम्मद अझरुद्दीन, कपिल देव (kapil dev) यांच्यासह अन्य काही खेळाडूंवर बायोपीक बनवण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आता आयपीएलचे निर्माता ललित मोदी (Lalit Modi) यांच्यावरही बायोपीक येणार आहे. बीसीसीआयमध्ये पैशांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी आरोप असलेले ललित मोदी १२ वर्षांपासून फरार आहेत.

'८३' आणि 'थलायवी' सिनेमा बनवणारे निर्माता विष्णु इंदूरी हे ललित मोदींवर सिनेमा करणार असल्याची माहिती तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. हा सिनेमा ललित मोदी यांच्यावर लिहिलेलं 'द आयपीएल - ललित मोदी सागा' पुस्तकावर आधरित असणार आहे. ज्येष्ठ पत्रकार बोरिया मजूमदार यांनी ललित मोदींवर हे पुस्तक लिहिलं आहे. १८ एप्रिलला सुरुवात झालेल्या आयपीएलला आज १५ वर्ष पूर्ण झाल्याने ललित मोदींवर सिनेमा येत असल्याची घोषणा करण्यात आलीय. जेव्हा आयपीएल सुरु झाली त्यावेळी कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर यांच्यात पहिला सामना खेळवण्यात आला होता.

Lalit Modi
विरेंद्र सेहवागची भीती वाटायची; KKRच्या 'या' दिग्गज खेळाडूची कबुली

सिनेमामध्ये 'हे' दाखवलं जाणार

ललित मोदी यांच्यावर आधारित सिनेमामध्ये आयपीएलची सुरुवात कशी झाली यासह मोंदीच्या आयपीएलच्या प्रवासाबद्दलची कहाणी दाखवण्यात येणार आहे. मोदींनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याबाबतही सिनेमामध्ये सांगितलं जाणार आहे.

भारताबाहेर आहेत ललित मोदी

ललित मोदी भारताबाहेर असून ते आता लंडनमध्ये राहत आहेत. त्यांच्यावर बीसीसीआयमध्ये पैशांचा गैरव्यवहार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मोदी हे आयपीएलचे पहिले चेअरमन आहेत तसंच तीन वर्षे त्यांनी आयपीएलचं आयुक्तपदही भूषवलं. पाच वर्षे ते बीसीसीआयचे उपाध्यक्ष होते. राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदावरही मोदी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com