Virat Kohli Yuvraj Singh Saam Tv
Sports

Virat Kohli Yuvraj Singh : विराट कोहलीमुळे युवराज सिंगचं करियर संपलं, भारताच्या माजी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

Yuvraj Singh Career : कॅन्सरवर मात केल्यानंतर जेव्हा युवराज संघात परतला, तेव्हा त्याला मदत मिळाली नाही. खराब फॉर्ममुळे त्याला संघातून वगळले गेले, पुढे त्याला निवृत्ती घ्यावी लागली.

Yash Shirke

Robin Uthappa On Yuvraj Career : भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने नुकतंच एका मुलाखतीमध्ये खळबळजनक विधान केले. युवराज सिंगच्या निवृत्तीमागे अप्रत्यक्षपणे विराट कोहली असल्याचे उथप्पाने म्हटले आहे. कॅन्सरवर मात केल्यानंतर जेव्हा युवराज संघामध्ये राहण्यासाठी प्रयत्न करत होता, तेव्हा विराटने युवराजला मदत करणे टाळले.

२०११ मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता. तेव्हा युवराज सिंग 'मॅन ऑफ द मॅच' ठरला होता. त्याने फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये अमूल्य योगदान दिले होते. कॅन्सर असतानाही त्याने माघार न घेता संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली होती. २००७ च्या टी २० विश्वचषकाच्या भारतीय संघातही युवराज सिंग होता. २०११ विश्वचषकानंतर कॅन्सर उपचारांसाठी युवराज रुग्णालयात पोहोचला.

रॉबिन उथप्पा म्हणाला की, 'कॅन्सरसारख्या महाभयंकर आजारावर मात करुन युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरला. कॅन्सरमुळे त्याच्या खेळावर काहीसा परिणाम झाला. कमबॅक केल्यानंतर तो खराब फॉर्ममध्ये होता. दरम्यान भारतीय संघात स्थान टिकवण्यासाठी एका फिटनेस टेस्टमध्ये फक्त दोन गुणांनी युवराज मागे पडला होता. तेव्हा युवराजने विराट कोहलीकडे दोन गुणांची सवलत मागितली होती. पण विराटला याला नकार दिला.'

'दोन गुणांची सवलत न मिळाल्यानंतरही युवराजने फिटनेस टेस्ट पास केली. त्याला संघात घेण्यात आले. पण एका सामन्यातील खराब फॉर्म युवराजला मालिकेतून वगळण्यात आले. ही गोष्ट युवराजच्या करिअरसाठी घातक ठरली. खराब फॉर्ममुळे मालिकेतून वगळल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. पुढे त्याला कमबॅक करण्याची संधी दिली नाही', असे रॉबिन उथप्पा म्हणाला. त्याच्या मते, जेव्हा विराट कोहली संघाचा कर्णधार होता, तेव्हा युवराज सिंगाला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. विराटने त्याला सपोर्ट केला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT