
भारताचा स्टार गोलंदाज युझवेंद्र चहल सध्या तुफान चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांनीही तसे संकेत दिले आहेत. नेहमी एकत्र दिसणाऱ्या या कपलने इंस्टाग्रामवरुन एकमेकांना अन्फॉलो केलं आहे.
यासह इंस्टाग्रामवरुन एकमेकांचे फोटो देखील डिलीट केले आहेत. या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना, आणखी एका भारतीय खेळाडूचा संसार मोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
चहल आणि धनश्रीचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरु असताना, मनिष पांडेच्या घटस्फोटाचीही चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. मनिष पांडे आणि अर्शिता शेट्टी दोघेही घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवरन अन्फॉलो केलं आहे. अर्शिता शेट्टीबद्दल बोलायचं झालं, तर तिने गेल्या वर्षी जून महिन्यानंतर मनिषसोबतचा एकही फोटो शेअर केलेला नाही. यासह तिने मनिष पांडेसोबत असलेले फोटो डिलीट करायला सुरुवात केली आहे. यावरुन दोघेही वेगळे होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
अर्शिता शेट्टी आणि मनिष पांडे यांनी आपल्या नात्याबद्दल उघडपणे काहीच सांगितलेलं नाही. दोघे घटस्फोट घेणार याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या केवळ अफवा असल्याचंही म्हटलं जात आहे. दोघेही आपल्या नात्याबद्दल काय निर्णय घेणार?हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
युझवेंद्र चहल आणि धनश्री हे कपल फनी कपल म्हणून ओळखलं जायचं. दोघेही डान्सचे व्हिडिओ आणि मजेशीर व्हिडिओ शेअर करायचे. मात्र अचानक दोघांनी एकमेकांसोबत असलेले फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले. त्यामुळे दोघांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.