Yuvraj Singh on Virat Kohli  Saam TV
Sports

Yuvraj Singh on Virat Kohli : विराट स्वत:ला ख्रिस्तियानो रोनाल्डो समजतो, पण तो नाही; युवराज सिंहने असं का म्हटलं?

Yuvraj Singh on Virat Kohli : विराट कोहलीला त्याच्या सुरुवातीच्या काळात प्रोत्साहन देणाऱ्या खेळाडूंमध्ये युवराज सिंगचं नाव आहे.

प्रविण वाकचौरे

Yuvraj Singh on Virat Kohli :

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंह सध्या त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबतच्या मैत्रीबाबत दिलेल्या वक्तव्यानंतर आता त्याने विराट कोहलीवर मोठं भाष्य केलं आहे.

कोहली स्वत:ला ख्रिस्तियानो रोनाल्डो समजतो, पण तो तसा नाही, असं युवराजने विराटबाबत म्हटलं आहे. युवराज आणि कोहली दोघेही भारतासाठी एकत्र खेळले आहेत. दोघेही आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघात काही हंगामात एकत्र होते.

युवराजने 2019 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला निरोप दिला, तर विराट कोहली आज संघाचा स्टार खेळाडू आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू असण्यासोबतच हे दोघेही चांगले फुटबॉलपटू आहेत आणि युवराज या खेळात कोहलीपेक्षा सरस असल्याचे मानतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विराट स्वत:ला ख्रिस्तियानो रोनाल्डो समजतो

युवराजने एका मुलाखतीत म्हटलं की, विराट आणि माझ्यात फुटबॉलवरुन मोठी लढत होती. आशिष नेहरा आणि वीरेंद्र सेहवागसोबतही मी फुटबॉल खेळताना भिडलो आहे. कोहली चांगला फुटबॉल खेळतो का? असे विचारले असता युवराजने म्हटलं की, विराटला असे वाटते.

त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु माझ्याकडे त्याच्यापेक्षा अधिक क्षमता आहे. तो एक महान फलंदाज आहे आणि मी एक चांगला फुटबॉलपटू आहे. विराट स्वत:ला ख्रिस्तियानो रोनाल्डो समजतो, पण तो नाही. क्रिकेटमध्ये तो ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. (Latest News)

विराट आता बिझी असतो

विराट कोहलीला त्याच्या सुरुवातीच्या काळात प्रोत्साहन देणाऱ्या खेळाडूंमध्ये युवराज सिंगचं नाव आहे. दोन्ही खेळांडूंचं नातंही घट्ट आहे. दोघेही सोशल मीडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा देताना दिसतात.

मात्र, युवराजने खुलासा केला की, विराट कोहली आता खूप बिझी असतो, त्यामुळे मी त्याला त्रास देत नाही. विराट कोहली भारतीय संघात आला तेव्हा त्याचं टोपन नाव चिकू होते. मात्र आता चिकू विराट कोहली आहे, यात मोठा फरक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT