वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तान क्रिकेट संघ सेमिफायनलमध्ये सहज पोहोचेल, असा दावा केला जात होता. मात्र, बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघानं अपेक्षित कामगिरी केली नाही. आता पाकिस्तान सेमिफायनलच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर झाला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसीम अक्रमनंही पाकिस्तानच्या संघाची खिल्ली उडवली आहे. सेमिफायनलमध्ये पोहोचण्याचा सोपा 'मार्ग' सांगितला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. मैदानात अशक्य गोष्टीही शक्य होताना अनेकदा बघितलं आहे. पाकिस्तानला सेमिफायनलमध्ये पोहोचण्यासाठी अशीच अशक्य समिकरणं मांडली जात आहेत. पण ती शक्य होणे तितकेच कठीण आहे.
पाकिस्तानच्या सेमिफायनलच्या गणितावर अनेक मीम्स व्हायरल होत असतानाच, माजी कर्णधार वसिम अक्रमने सोपा मार्ग सांगून खिल्ली उडवली आहे. पाकिस्तानचा माजी प्रशिक्षक मिसबाह उल हक यानेही अक्रमला साथ दिली.
पाकिस्तानला वर्ल्डकपमधील उर्वरित सामना इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. इंग्लंडचा संघ सेमिफायनलमधून आधीच बाहेर झाला आहे. पाकिस्तानला सेमिफायनलमध्ये पोहोचायचं असल्यास इंग्लंडला किमान २८० धावांनी पराभूत करावं लागेल. इंग्लंडकडून पाकिस्तानला जे टार्गेट दिलं जाईल, ते पाच षटकांतच पूर्ण करावं लागेल. या दोन गोष्टी केल्या तरच, पाकिस्तान सेमिफायनलमध्ये जाईल. वास्तवात या गोष्टी खूपच कठीण आहेत.
द पव्हेलियन या टॉक शोमध्ये वसिम अक्रम सहभागी झाला होता. या शोआधी अक्रमने पाकिस्तानची खिल्ली उडवली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करावी आणि नंतर इंग्लंडच्या खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये बंद करून बाहेरून टाळे लावून घ्यावे. सर्वांना २० मिनिटांच्या आत टाइम आऊट करून सामना जिंकावा, असं अक्रम या शोच्या आधी म्हणाल्याचे होस्ट फखरने सांगितले.
अक्रमच्या या सल्ल्यानंतर मिसबाह उल हकनेही सल्ला दिला. प्रथम फलंदाजी करण्याची गरजच काय? इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करा आणि मैदानात येण्याआधीच ड्रेसिंग रूमला टाळे ठोका, अशी अजब आयडीया सांगितली. त्यावर शोमध्ये एकच हशा पिकला. या शोमध्ये शोएब मलिक आणि मोइन खानही सहभागी झाला होता. पाकिस्तानचे सेमिफायनलमध्ये पोहोचणे कठीण आहे, असे त्यांनीही मान्य केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.