Yuvraj Singh Yograj Singh x
Sports

Yuvraj Singh : वडिलांना साधा कुर्ता घेत नाही पण 'त्या' बाबाला १५ लाखांचं घड्याळ देतो, युवराज सिंगवर गंभीर आरोप

Yuvraj Singh Yograj Singh : योगराज सिंग यांनी त्यांचा मुलगा युवराज सिंगवर गंभीर आरोप केले आहेत. युवराज माझ्याकडे दुर्लक्ष करतो, असे म्हणत त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Yash Shirke

Yograj Singh : युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे कडक तत्वांचे आहेत. गेल्या काही वर्षांत, युवराजने त्याच्या वडिलांशी असलेल्या त्याच्या कठीण नात्याबद्दल उघडपणे सांगितले आहे, ज्यांना फक्त त्याने क्रिकेटमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करावी असे वाटत होते. अलीकडेच, योगराज यांनी त्याच्या माजी पत्नीवर आणि तिने आणि त्यांचा मुलगा युवराजने त्याला कसे सोडून दिले याबद्दल काही धक्कादायक टिप्पणी केली. त्याने हे देखील उघड केले की त्याच्या मुलाने त्याला कधीही काहीही भेट दिले नाही.

उडता पंजाबला योगराज सिंग यांनी मुलाखत दिली. 'माझे कष्ट, माझा त्याग व्यर्थ गेले आहेत. मी युवराजला रक्त, घाम आणि अश्रूंनी उंचीवर पोहोचवून ठेवले होते. त्याच्यावर घेतलेली माझी मेहनत वाया गेली. तो माझ्याकडे दुर्लक्ष करतो, असे योगराज म्हणाले. मला त्याने कधीही साधा कुर्ता भेट म्हणून दिला नाहीये. पण एका बाबाला त्याने १५ लाखांचे घड्याळ दिले होते', असे म्हणत त्यांनी युवराजवर टीका केली.

'ज्या वडिलांनी तुला उंचीवर पोहोचवण्यासाठी रक्त, घाम, अश्रू सांडले. ते वडील तुम्हाला एका साधूबाबापेक्षा कमी वाटतो? ज्या माणसाने चार कुटुंबांचा भार उचलला आणि स्वतःवर काहीच खर्च केला नाही, त्याच्याकडे तुम्ही पाठ फिरवता? तुमच्याकडे वडिलांनी कुर्ता घ्यायला पैसे नाहीयेत, पण साधूबाबाला महागडं घड्याळ देता?' असे म्हणताना योगराज यांनी युवराजवरचा राग व्यक्त केला.

मुलाखतीदरम्यान योगराज यांनी साधूबाबाचे नाव हंसालीवाले बाबा आहे असे सांगितले. त्या बाबाच्या उपदेशावरून माझ्या पत्नीने माझ्यावर टीका केली. खरंतर गुरु ग्रंथ साहिबपेक्षा काहीही मोठं नाहीये. माझा या आध्यात्मिक बाबांवर अजिबात विश्वास नाहीये. पत्नी नवऱ्याचे पाय दाबू शकत नाही, त्याच्यासाठी जेवण बनवू शकत नाही, पण ती बाबांची सेवा करताना आनंदी असते? याला काही अर्थ आहे का? असेही योगराज यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT