vaibhav suryavanshi news  Saam tv
Sports

आयपीएल स्पर्धेत मोठा ट्विस्ट; ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वैभव सूर्यवंशीने विराट कोहलीला मागे टाकलं

vaibhav suryavanshi news : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वैभव सूर्यवंशीनेही मोठी उडी मारली आहे. १५ वर्षांच्या वैभवने विराट कोहलीला देखील मागे टाकले आहे.

Vishal Gangurde

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत वैभव सूर्यवंशीची जोरदार चर्चा

वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठी आघाडी

वैभवने फलंदाजीच्या जोरावर कोहलीला टाकले मागे

राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये बुधवारी आयपीएल स्पर्धेतील ३२ वा सामना झाला. आरआरने लखनौला ४० धावांनी धूळ चारली. लखनौ संघाने दिलेल्या अवघ्या १६० धावांचं आव्हानाचा पाठलाग राजस्थानचा संघ करू शकला नाही. लखनौ संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या आयपीएल स्पर्धेत १५ वर्षांचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीची जोरदार चर्चा होत आहे.

वैभव सूर्यवंशीने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर उडी मारली आहे. तर विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. वैभवने आतापर्यंत सात सामन्यात ३६.२८ च्या सरासरीने २५४ धावा कुटल्या आहेत. लखनौच्या विरोधात सूर्यवंशीची फलंदाजी फारशी चालली नाही. त्याने ११ चेंडूवर अवघ्या ८ धावा ठोकल्या. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. त्याने सहा सामन्यात ४९.४० च्या सरासरीने २६७ धावा कुटल्या आहेत.

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार हा आठव्या स्थानावर आहे. तर यशस्वी जायस्वालने तिसऱ्या स्थानावर उडी मारली आहे. यशस्वीने लखनौच्या विरोधात १२ चेंडूत २२ धावा कुटल्या. त्याने आतापर्यंत सात सामन्यात ४९ च्या सरासरीने २४५ धावा कुटल्या आहेत.

ऑरेंज कॅप सध्या अभिषेक शर्माच्या डोक्यावर आहे. सनरायजर्स हैदराबादचा सलामीवीर अभिषेकने सात सामन्यात ३२३ धावा कुटल्या आहेत. त्याने ५३.८३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याचबरोबर हेनरिक क्सासेनने सात सामन्यात ३२० धावा करत दुसऱ्या स्थानावर आहे.

लखनौचे प्रयत्न फोल ठरले

जोफ्रा आर्चर (२० धावा), नांद्रे बर्गर (२७ धावा) या दोघांनी लखनौ संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मिचेल मार्शने ४१ चेंडूत सर्वाधिक ५५ धावा कुटल्या. या व्यतिरिक्त निकोलस पूरन (२२ धावा) आणि हिंमत सिंह (१५ धावा ) या दोघांचे प्रयत्न फोल ठरले. रविंद्र जडेजाने चांगल्या कामगिरीच्या जोरावर राजस्थानने लखनौला पराभूत केले. 'प्लेयर ऑफ द मॅच' जडेजाने २९ चेंडूत ४९ धावांची खेळी खेळली. गोलंदाजी करताना २९ धावा देत १ गडी बाद केला. राजस्थान रॉयल्सने सहा विकेट गमावून १५९ धावा कुटल्या. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ संघ अवघ्या ११९ धावांवर गारद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT