dinesh karthik saam tv
Sports

World Cup 2023: विकेटकिपरचा प्रश्न मिटला! वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून दिनेश कार्तिक करतोय कमबॅक? स्वत: ट्विट करत दिली माहिती

Dinesh Karthik News: दिनेश कार्तिकची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Dinesh Karthik In World Cup 2023:

आयपीएल २०२२ स्पर्धेत दमदार कामगिरी करून दिनेश कार्तिकने भारतीय संघात कमबॅक केले होते. त्याला आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळाली होती.

यावर्षी भारतीय संघाला आशिया चषक स्पर्धा आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळायची आहे. या स्पर्धेपूर्वी दिनेश कार्तिकची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत होणार दिनेश कार्तिकची एन्ट्री..

दिनेश कार्तिकने असा दावा केला आहे की,तो वर्ल्डकप स्पर्धेत कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. तर झाले असे की, एका युजरने ट्विट करत विचारले होते की, 'आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज कोण असेल?'या ट्विटला उत्तर देत दिनेश कार्तिकने म्हटले की, 'मी वर्ल्डकपमध्ये नक्की दिसेल. याव्यतिरीक्त मी आणखी काहीच सांगु शकत नाही.' दिनेश कार्तिकचे हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. असं म्हटलं जात आहे की, दिनेश कर्तिक खेळाडू म्हणून कमबॅक करताना दिसेल की नाही हे सांगणं कठीण आहे. मात्र तो समालोचकाची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतो. (Latest sports updates)

टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेत दिनेश कार्तिकचा फ्लॉप शो..

दिनेश कार्तिकला टी-२० वर्ल्डकप २०२२ भारतीय संघात स्थान दिले गेले होते. मात्र या स्पर्धेत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. या स्पर्धेतील ३ सामन्यांमध्ये त्याला ४.६६ च्या सरासरीने केवळ १४ धावा करता आल्या होत्या.

या सुमार कामगिरीनंतर त्याला भारतीय संघातून बाहेर केलं गेलं होतं. या स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यातही त्याला बाहेर बसावं लागलं होतं. टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धा झाल्यानंतर त्याला भारतीय संघासाठी एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

आशिया चषक २०२२ स्पर्धेसाठी मिळालं होतं स्थान..

दिनेश कार्तिकला आशिया चषक २०२२ स्पर्धेसाठीही भारतीय संघात स्थान दिले गेले होते. या स्पर्धेत त्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान दिले गेले होते. या स्पर्धेतही तो आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला होता.

दिनेश कार्तिकने आतापर्यंत ६० टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २६.५८ च्या सरासरीने ६८६ धावा केल्या आहेत. तसेच भारतीय संघासाठी त्याला २६ कसोटी आणि ९४ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khardi Kasara : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर! कसारा-खर्डी मार्गावर सुरू झाली तिसरी मार्गिका; प्रवास होणार सुपरफास्ट

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत पुलावर लटकून तरुणाचा गोंधळ; नागरिकांच्या धाडसामुळे टळली दुर्घटना

Dombivli Water Cut : डोंबिवलीत सलग ३६ तास पाणी बंद; MIDC कार्यालयावर नागरिकांची धडक

Martyred Policemen: शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार २ कोटींची मदत, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Daler Mehndi: 'गायक दलेर मेहंदी दारू पिऊन स्टेजवर आले'; त्या व्हायरल व्हिडिओने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT