Team India News: विश्रांती नव्हे तर 'या' कारणामुळे विराट,रोहित टी-२० क्रिकेट खेळणं टाळताय

Rohit Sharma - Virat Kohli: काय आहे यामागचं कारण? स्वत: रोहितने याबाबत खुलासा केला आहे.
virat kohli rohit sharma
virat kohli rohit sharmasaam tv
Published On

Team India: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धा झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना भारतीय संघासाठी खुप कमी टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.

मात्र यामागचं कारण काय याबाबत बीसीसीआयकडून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. नुकताच कर्णधार रोहित शर्माने यामागचं नेमकं कारण काय याबाबत खुलासा केला आहे.

virat kohli rohit sharma
Team India News: एशिया कप २१ तर वर्ल्डकप ५७ दिवसांवर, टीम इंडियाला केव्हा मिळणार परफेक्ट प्लेइंग ११; काय आहेत आव्हानं? वाचा सविस्तर

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मुंबईतील एका इंव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना त्याने यामागचं कारण सांगितलं आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, 'गेल्या वर्षी टी-२० वर्ल्डकप होता, त्यामुळे आम्ही वनडे क्रिकेट खेळणं टाळत होतो.

यावर्षी वनडे वर्ल्डकप आहे त्यामुळे आम्ही टी-२० क्रिकेट खेळणं टाळतोय. हे वर्ल्डकप स्पर्धेचं वर्ष आहे ,त्यामुळे आम्हाला फ्रेश राहायचं आहे. आधीच संघातील खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. आता दुखापतीची भिती वाटते.'

दुखापतीने वाढवली टीम इंडीयाची चिंता..

वर्ल्डकप स्पर्धा सुरू व्हायला अवघे ५० दिवस शिल्लक राहीले आहेत. मात्र अजुनही संघातील प्रमुख खेळाडू पुर्णपणे फिट झालेले नाहीत.

गेले काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमराह भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल अजुनही कमबॅक करण्याच्या वाटेवर आहेत. (Latest sports updates)

virat kohli rohit sharma
Shikhar Dhawan Reaction: 'मला मोठा धक्काच बसला..', संघातून वगळल्यानंतर शिखर धवन पहिल्यांदाच झाला व्यक्त, म्हणाला...

भारतात रंगणार वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार..

यावर्षी भारतात वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. येत्या ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबर रंगणार आहे.

भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर भारत -पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबर रोजी रंगणार होता. मात्र सुधारीत वेळापत्रकानुसार हा सामना १४ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com