भारतीय संघातील अनुभवी फलंदाज शिखर धवन गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. शुबमन गिलची संघात एन्ट्री झाल्यापासून शिखर धवनला संघात स्थान मिळणं कठीण झालं आहे. काही महिन्यांपूर्वी तो संघाचे नेतृत्व करताना दिसून आला होता.
मात्र त्याला १५ खेळाडूंमध्ये देखील स्थान दिलं जात नाहीये. संघाबाहेर असलेल्या शिखर धवनने याबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. (Shikhar Dhawan)
भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवनवर संघाची जबाबदारी सोपवली जात होती. येत्या काही दिवसात भारतीय संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेसाठी शिखर धवनला भारतीय संघात स्थान मिळणं कठीण आहे.
त्यामुळे असं म्हटलं जातं होतं की, शिखर धवन आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो. मात्र या संघाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे. शिखरला संघात स्थान मिळालं नाही. यावरून स्पष्ट आहे की, बीसीसीआय शिखर धवनला बसवण्याच्या तयारीत आहे. (Latest sports updates)
तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करत आहे. यापूर्वी ही जबाबदारी शिखर धवन पार पाडायचा. मात्र बीसीसीआय आता त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
तरीदेखील त्याने संघात कमबॅक करण्याची तयारी ठेवली आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, ' मी निश्चितच तयार असेल. त्यामुळेच मी स्वतः ला फिट ठेवतोय. कमबॅक करण्याचा चान्स १ टक्के असो किंवा २० टक्के, मी तयार आहे.'
शिखर धवनला गेल्या काही मालिकांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली गेली होती. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी देखील त्याला ही जबाबदारी दिली जाणार असल्याचं म्हटलं जा होतं. मात्र त्याला संघात स्थान दिलं गेलं नाही.
याबाबत बोलताना त्याने म्हटले की, ' जेव्हा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली त्यावेळी संघात माझं नाव नव्हतं. हे पाहून मला आश्चर्य झाला. त्यानंतर मला वाटलं की, त्यांची विचारप्रक्रिया वेगळी असेल. याचा मला स्वीकार करावा लागेल. मला आनंद आहे की, ऋतु(ऋतुराज) संघाचे नेतृत्व करतोय. या संघात युवा खेळाडू आहेत, मला विश्वास आहे की हे सर्व खेळाडू चांगली कामगिरी करतील.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.