वर्ष २०२४ संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या वर्षात अनेक मोठ मोठे रेकॉर्ड बनवले गेले. तर काही मोठे रेकॉर्ड तोडले ही गेले. हे वर्ष युवा फलंदाजांनी गाजवलं. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. दरम्यान कोण आहेत २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज? जाणून घ्या.
श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज कुसल मेंडिसने २०२४ वर्ष गाजवलं. त्याने श्रीलंकेला अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. २०२४ वर्षात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यावर्षी त्याने ४८ सामन्यांमध्ये ३७.२० च्या सरासरीने १८६० धावा केल्या. ज्यात २ शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान तो ९ कसोटी, २२ टी -२० आणि १७ वनडे सामने खेळण्यासाठी मैदानात उतरला.
भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल यावर्षी चमकला. तो यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. यशस्वीने यावर्षी फलंदाजी करताना २३ सामन्यांमध्ये ५२.०८ च्या सरासरीने १७७१ धावा केल्या. ज्यात ३ शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याने ३५९ धावा केल्या आहेत.
यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रीलंकेच्या आणखी एका फलंदाजाचा समावेश आहे. पथूम निसंकाने २०२४ मध्ये ४४.६३ च्या सरासरीने १६९६ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ शतक आणि ९ अर्धशतकं झळकावली.
इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकने यावर्षी चांगलाच हल्लाबोल केला. यावर्षी तो २७ सामने खेळण्यासाठी मैदानात उतरला. यादरम्यान त्याने ५८.३३ च्या सरासरीने १५७५ धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ शतक आणि ६ अर्धशतकं झळकावली.
इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रूटचा देखील या यादीत समावेश आहे. त्याने देखील या यादीतील टॉप ५ फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे. त्याने या वर्षातील १७ सामन्यांमध्ये १५५६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६ शतक आणि ५ अर्धशतकं झळकावली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.