IND vs AUS: यशस्वी भव! अर्धशतक झळकावताच जयस्वालने मास्टर ब्लास्टरच्या रेकॉर्डची केली बरोबरी

Yashasvi Jaiswal Equals Sachin Tendulkar Record: भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशश्वी जयस्वालने शानदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
IND vs AUS: यशस्वी भव! अर्धशतक झळकावताच जयस्वालने मास्टर ब्लास्टरच्या रेकॉर्डची केली बरोबरी
yashasvi jaiswal pti
Published On

भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने गेल्या काही वर्षात दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. मेलबर्न कसोटीतील दुसऱ्या डावात भारतीय संघाला जिंकण्यासाठी ३४० धावांची गरज आहे.

या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालने शानदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने असा काही कारनामा करुन दाखवला आहे, जो १४ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने करुन दाखवला होता.

जयस्वालची सचिन तेंडुलकर सारखी कामगिरी

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३४० धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील टॉप ऑर्डरचे फलंदाज केएल राहुल आणि रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर यशस्वी जयस्वालने रिषभ पंतसोबत मिळून डाव सांभाळला.

IND vs AUS: यशस्वी भव! अर्धशतक झळकावताच जयस्वालने मास्टर ब्लास्टरच्या रेकॉर्डची केली बरोबरी
IND vs AUS: आता हद्दच झाली...आधी विराटला जोकर म्हटलं आता रोहितचीही खिल्ली उडवली

यशस्वीने १२७ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे या मालिकेतील तिसरे अर्धशतक ठरले. यासह २०२४ मध्ये त्याच्या बॅटमधून आलेले हे १२ वे अर्धशतक ठरले. यासह तो एकाच वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणारा दुसराच फलंदाज ठरला आहे.

IND vs AUS: यशस्वी भव! अर्धशतक झळकावताच जयस्वालने मास्टर ब्लास्टरच्या रेकॉर्डची केली बरोबरी
IND vs AUS: टीम इंडिया मेलबर्न कसोटी अजूनही जिंकू शकते; फक्त करावं लागेल हे काम

यशस्वी जयस्वालने माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये फलंदाजी करताना एकाच वर्षात १२ अर्धशतकं झळकावली होती. या यादीत माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग सर्वात पुढे आहे. त्याने एकाच वर्षात १३ वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली होती.

IND vs AUS: यशस्वी भव! अर्धशतक झळकावताच जयस्वालने मास्टर ब्लास्टरच्या रेकॉर्डची केली बरोबरी
IND vs AUS: टीम इंडिया मेलबर्न कसोटी अजूनही जिंकू शकते; फक्त करावं लागेल हे काम

असा रेकॉर्ड करणारा ठरला चौथा फलंदाज

यशस्वी जयस्वालच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तो ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळताना एकाच डावात सलग २ अर्धशतकं झळकावणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी मुरली विजय, विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांना हा कारनामा करता आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com