IND vs WI 1st Test: भारतीय संघाने वेस्टइंडीज संघावर एकतर्फी विजय मिळवला आहे. डोमिनिकाच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात पदार्पणवीर यशस्वी जयस्वालने जोरदार कामगिरी करत तुफानी शतक झळकावले आहे. त्याने १७१ धावांची खेळी केली. या कामगिरीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
यशस्वी जयस्वालने या डावात ३८७ चेंडूंचा सामना करत १७१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १६ चौकार आणि १ षटकार मारला. या खेळीसह तो पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकवणारा तिसरा भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे. दरम्यान या सामन्यानंतर त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.
हा सामना झाल्यानंतर त्याने म्हटले की, 'माझं लक्ष फक्त सामन्यावर होतं. भारतीय संघासाठी कसोटी सामना खेळणं भावुक करणारा क्षण आहे. ही सुरुवात आहे, मला माझं संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित ठेवायचं आहे आणि अशाच इनिंग खेळायच्या आहेत. माझ्या या प्रवासात अनेकांनी माझी मदत केली, मी सर्वांचे आभार मानतो.' (Latest sports updates)
इतिहास रचण्याची संधी हुकली..
यशस्वी जयस्वालने या खेळीदरम्यान अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. तो भारताबाहेर कसोटीत पदार्पण करताना सर्वात मोठी खेळी करणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत त्याने सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या मैदानावर १३३ धावांची खेळी केली होती. त्याच्याकडे आणखी एक मोठा विक्रम रचण्याची संधी होती जर त्याने पदार्पणाच्या सामन्यात दुहेरी शतक पूर्ण केलं असतं तर तो पदार्पणात दुहेरी शतक झळकावणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला असता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.