rohit sharma angry
rohit sharma angrytwitter

Rohit Sharma On Ishan Kishan: पदार्पणातच ईशानने केली मोठी चूक! ड्रेसिंग रूममध्ये असलेल्या रोहितचा पारा चढला; पाहा VIDEO

Rohit Sharma Angry: ईशान किशनची फलंदाजी सुरु असताना ड्रेसिंग रूममध्ये असलेला कर्णधार रोहित शर्मा त्याच्यावर भडकताना दिसून आला.
Published on

IND vs WI 1st Test: भारत विरूद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना डॉमिनिकाच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत १ डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला आहे. यासह या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.

या सामन्यात भारतीय संघाकडून २ खेळाडूंनी पदार्पण केलं. पदार्पणवीर यशस्वी जयस्वालने दमदार शतक झळकावले तर ईशान किशनला हवी तशी कामगिरी करता आली नाही.

दरम्यान ईशान किशनची फलंदाजी सुरु असताना ड्रेसिंग रूममध्ये असलेला कर्णधार रोहित शर्मा त्याच्यावर भडकताना दिसून आला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

rohit sharma angry
IND vs WI 1st Test Result: अश्विनच्या फिरकीसमोर विंडीजचा संघ गारद! पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा 1 डाव अन् 141 धावांनी विजय

आपला पहिलाच सामना खेळत असलेला ईशान किशन या सामन्यात संघर्ष करताना दिसून आला होता. विराट कोहली बाद झाल्यानंतर ईशान किशन फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. त्यावेळी १९ चेंडू खेळूनही त्याला १ धाव करता आली नव्हती. हे पाहून कर्णधार रोहित शर्मा त्याच्यावर भडकल्याचे पाहायला मिळाले.

ईशान किशन हा आक्रमक फलंदाज असल्याने त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र कसोटी कारकिर्दीतील पहिली धाव पुर्ण करण्यासाठी त्याला १९ चेंडूंचा सामना करावा लागला. हे पाहता कर्णधार रोहित शर्मा एक धाव तरी घे.. असा इशारा करताना दिसून आला.

ईशान किशन धावा करण्यासाठी संघर्ष करतोय हे पाहून रोहित शर्माने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी भारतीय संघाने डाव घोषित केला त्यावेळी ईशान किशन १ तर रविंद्र जडेजा ३७ धावांवर फलंदाजी करत होता. (Latest sports updates)

भारतीय संघाचा जोरदार विजय..

वेस्टइंडीज संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १५० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५ गडी बाद ४२१ धावा करत डाव घोषित केला. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वालने सार्वधिक १७१ धावांची खेळी केली होती.

तर कर्णधार रोहित शर्माने १०३ धावांची खेळी केली. पहिल्या डावात भरभक्कम आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाने वेस्टइंडिजला दुसऱ्या डावात अवघ्या १३० धावांवर ऑलआउट केलं. यासह १ डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाकडून आर अश्विनने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात ७ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com