yashasvi jaiswal twitter
Sports

Yashasvi Jaiswal Record: यशस्वी जयस्वालचं शानदार द्विशतक! असा कारनामा करणारा ठरलाय केवळ चौथा भारतीय फलंदाज

Yashasvi Jaiswal IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत यशस्वी जयस्वालने जोरदार शतक झळकावलं आहे.

Ankush Dhavre

Yashasvi Jaiswal News In Marathi:

भारताचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल दिवसेंदिवस यशाच्या शिखरावर जात आहे. वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमध्येही आपला शिक्का उमटवला आहे. ज्या मैदानावर संघातील इतर फलंदाजांची धावसंख्या केवळ आणि केवळ ३५ धावा इतकी होती. त्याच मैदानावर यशस्वी जयस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत द्विशतकी खेळी केली आहे.

यशस्वी जयस्वाल केवळ आपला सहावा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. यादरम्यान त्याने ५०० धावांचा पल्ला गाठला आहे. आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत त्याने ६० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत द्विशतकी खेळी करताच त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. (Cricket news in marathi)

असा कारनामा करणारा चौथा भारतीय फलंदाज..

यशस्वी जयस्वालने या सामन्यातील पहिल्या डावात १५१ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळपट्टीवर संघातील फलंदाज येत होते आणि जात होते.

मात्र जयस्वालने एक बाजू धरुन ठेवली होती. पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत यशस्वी जयस्वाल १७९ धावांवर नाबाद होता. त्याला दुसऱ्या दिवशी द्विशतक पूर्ण करण्यासाठी केवळ २१ धावांची गरज होती. त्याने चौकार आणि षटकार मारत आपलं द्विशतक पूर्ण केलं.

यशस्वी जयस्वाल हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये द्विशतकी खेळी करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारतीय संघाकडून खेळताना विराट कोहली, मयांक अगरवाल आणि रोहित शर्माने द्विशतकी खेळी केली होती. जयस्वालला आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र यशस्वी जयस्वाल २०९ धावा करत माघारी परतला. त्याला अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनने बाद करत माघारी धाडलं. भारतीय संघाचा डाव ३९६ धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT