Yashasvi Jaiswal Record: इंग्लंडच्या गोलंदाजांवर भारी पडला जयस्वाल! यशस्वी खेळी करत दिग्गज खेळाडूंच्या यादीत मिळवलं स्थान

Yashasvi Jaiswal Record News: वायझॅगच्या मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने नाबाद १७९ धावांची खेळी केली आहे.
yashasvi jaiswal
yashasvi jaiswalsaam tv news
Published On

India vs England 2nd Test:

भारताचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालची बॅट चांगलीच गरजली. वायझॅगच्या मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने नाबाद १७९ धावांची खेळी केली आहे. या खेळीसह त्याने अनेक मोठे रेकॉर्डस् मोडून काढले आहेत. यादरम्यान त्याने माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागच्या रेकॉर्डच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवस अखेर ३३६ धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर उतरला. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत, २५७ चेंडूत नाबाद १७९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १७ चौकार आणि ५ षटकार मारले. एकीकडे फलंदाजांचं येण्या जाण्याचं सत्र सुरू होतं. तर दुसरीकडे जयस्वालने एक बाजू धरून ठेवली होती. (Cricket news in marathi)

yashasvi jaiswal
IND vs ENG 2nd Test Day 1: जयस्वालची द्विशतकाकडे 'यशस्वी' वाटचाल! पहिल्या दिवशी टीम इंडिया मजबूत स्थितीत

या रेकॉर्डच्या यादीत मिळवलं स्थान..

कसोटी क्रिकेटच्या पहिल्याच दिवशी सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड विरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. त्याने २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात २२८ धावांची खेळी केली होती.

त्यानंतर २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात १९५ धावांची खेळी केली होती. तर कोलकातामध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना वसीम जाफरने १९२ धावा केल्या होत्या. २०१७ मध्ये शिखर धवनने श्रीलंकेविरुद्ध खेळताना १९० धावा केल्या होत्या. त्यानंतर २००६ मध्ये विरेंद्र सेहवागने वेस्टइंडीजविरुद्ध खेळताना १८० धावा केल्या होत्या. आता या यादीत यशस्वी जयस्वालचंही नाव जोडलं गेलं आहे. त्याने नाबाद १७९ धावांची खेळी केली आहे.

yashasvi jaiswal
IND vs ENG 2nd Test: विराट-राहुल संपूर्ण मालिकेतून बाहेर होणार? वाचा लेटेस्ट अपडेट्स

यशस्वी जयस्वालच्या या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ६ गडी बाद ३३६ धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वालला वगळलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com