yashasvi jaiswal  PTI
क्रीडा

Yashasvi Jaiswal Record: मानलं रे पठ्ठ्या! १४७ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात कोणालाच नाही जमलं ते यशस्वी जयस्वालने करून दाखवलं

India vs England 3rd Test: ज्या खेळपट्टीवर इंग्लंडचे फलंदाज संघर्ष करताना दिसून आले. त्याच खेळपट्टीवर भारताचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.

Ankush Dhavre

Yashasvi Jaiswal, India vs England Test Series:

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालची बॅट जोरदार तळपली. ज्या खेळपट्टीवर इंग्लंडचे फलंदाज संघर्ष करताना दिसून आले. त्याच खेळपट्टीवर भारताचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याने १४ चौकार आणि १२ षटकारांच्या साहाय्याने २३६ चेंडूत २१४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे.

१४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं..

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ३ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने २२ षटकार मारले आहेत. १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्याही फलंदाजाने एकाच कसोटीत मालिकेत २० पेक्षा अधिक षटकार मारले आहेत.

यशस्वी जयस्वालच्या विक्रमी षटकारांनी भारतीय संघाच्या नावेही मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. भारतीय संघाने एका कसोटी मालिकेत ४८ षटकार मारले आहेत. यासह भारतीय संघाने आपलाच रेकॉर्ड मोडून काढला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ४७ षटकार मारले होते. मुख्य बाब म्हणजे या मालिकेतील २ सामने अजूनही शिल्लक आहेत. (Cricket news in marathi)

या बाबतीतही भारतीय संघ नंबर १..

एका कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीतही भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाने राजकोट कसोटीत तब्बल २८ षटकार मारले आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये विशाखापट्टनममध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी २७ षटकार मारले होते.

भारतीय संघाचा शानदार विजय..

राजकोट कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडला जिंकण्यासाठी ५५७ धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना इंग्लडचा डाव अवघ्या १२२ धावांवर संपुष्टात आला. यासह भारतीय संघाने या सामन्यात ४३४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

SCROLL FOR NEXT