भारत आणि इंग्लंड (IND vs ENG 3rd Test ) या दोन्ही संघांमध्ये राजकोटमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यात सरफराज खान ( Sarfaraz Khan) आणि यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला (Dhruv Jurel) पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू कसून सराव करताना दिसून आले आहेत.
या सामन्यात युवा खेळाडूंना खेळण्याची संधी दिली जाणार आहे. कारण केएल राहुल या सामन्यातून बाहेर पडला आहे. तर श्रेयस अय्यरला दुखापतीतून सावरु शकलेला नाही. हे दोन्ही खेळाडू बाहेर झाल्यानंतर टीम मॅनेजमेंटने युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे अशा खेळाडूंसाठी भारतीय संघाचं दार उघडण्यात आलं आहे. हे खेळाडू तिसऱ्या कसोटीत पदार्पण करु शकतात.
मालिकेतील दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलने शतकी खेळी केली होती. या सामन्यादरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे फलंदाजी केल्यानंतर तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर येऊ शकला नव्हता. मात्र त्याची दुखापत गंभीर नसून तो तिसऱ्या कसोटीत खेळताना दिसून येईल. (Cricket news in marathi)
बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ..
बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ध्रुव जुरेल भारतीय संघात पदार्पण करण्याबाबत बोलताना दिसून येत आहे. यासह त्याचा सराव देखील दाखवण्यात आला आहे. २३ वर्षीय युवा फलंदाज ध्रुव जुरेलने २ वर्षांपूर्वी देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. या २ वर्षात त्याने दमदार कामगिरी करत निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
ध्रुव जुरेलसह रजत पाटीदार आणि सरफराज खानने देखील मैदानात घाम गाळला. हे युवा खेळाडू स्लिपमध्ये सराव करताना दिसून आले. या सामन्यात केएस भरतला बाकावर बसावं लागेल. कारण गेल्या ७ सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने सातत्याने संधी दिली जात आहे. मात्र तो संधीचं सोनं करु शकलेला नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.