simran shaikh twitter
Sports

WPL 2025 Auction: मुंबईकर सिमरन शेख ठरली WPL लिलावातील सर्वात महागडी खेळाडू! लागली इतक्या कोटींची बोली

WPL 2025 Auction, Simran Sheikh: वुमेन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेसाठीचा लिलाव बंगळुरुत सुरु आहे. या लिलावात मुंबईकर सिमरन शेखवर रेकॉर्डब्रेकिंग बोली लागली आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी काही दिवसांपूर्वीच लिलाव सोहळा पार पडला. या लिलावात खेळाडूंवर रेकॉर्डब्रेक बोली लागली. दरम्यान वुमेन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेसाठीचा लिलाव बंगळुरुत सुरु आहे.

या लिलावात मुंबईकडून खेळणाऱ्या सिमरन शेखवर रेकॉर्डब्रेक बोली लागली आहे. ती या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. या लिलावात गुजरात जायंट्सने तिला तब्बल १ कोटी ९० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

सिमरन शेख ही युवा फलंदाज देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करते. गेल्या हंगामात ती युपी वॉरीयर्सकडून खेळताना दिसून आली होती. आगामी हंगामात ती गुजरात संघाकडून खेळताना दिसून येणार आहे.

सिमरनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. याच कामगिरीमुळे तिची डिमांड वाढली आहे. मात्र गेल्या हंगामात तिला आपली छाप सोडता आली नव्हती. गेल्या हंगामात फलंदाजी करताना तिने ९ सामन्यांमध्ये अवघ्या २९ धावा केल्या होत्या. आगामी हंमामात तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

गुजरातने या स्टार खेळाडूंना घेतलं संघात

गुजरातने या लिलावात २ स्टार खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिलं आहे. या लिलावात गुजरातने वेस्टइंडीजची अष्टपैलू खेळाडू डिएंड्रा डॉटीनला १ कोटी ७० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं. यासह सिमरन शेखला १ कोटी ९० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT