Gujarat Titans: गुजरात टायटन्सचा मास्टरस्ट्रोक! ऑक्शनआधी दिग्गज खेळाडूचा संघात प्रवेश

Parthiv Patel In Gujarat Titans: आगामी मेगा ऑक्शनपूर्वी गुजरात टायटन्सने दिग्गज खेळाडूला आपल्या संघात स्थान दिलं आहे.
Gujarat Titans: गुजरात टायटन्सचा मास्टरस्ट्रोक! ऑक्शनआधी दिग्गज खेळाडूचा संघात प्रवेश
gujarat titansyandex
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सच्या ताफ्यात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. भारताचा माजी फलंदाज पार्थिव पटेलची गुजरात टायटन्सच्या सहाय्यक आणि फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

पार्थिव पटेलला आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी त्याने डेक्कन चार्जर्स, कोच्ची टस्कर्स केरला, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद,मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आता हा अनुभवी खेळाडू गुजरातकडून खेळताना दिसून येणार आहे.

गुजरात टायटन्सने याबाबत घोषणा करत म्हटले की, ' १७ वर्षांचा अनुभव घेऊन भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल आमच्या संघात आपला अनुभव घेऊन येणार आहेत.' आयपीएल फ्रेंचायझींसोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ नसणार आहे.

यापूर्वी त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी टॅलेंट स्काऊटचं काम केलं आहे.यासह त्याने मुंबई एमिरेट्स संघासाठी फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका देखील बजावली आहे. पहिल्या हंगामापासून आयपीएल खेळणारा पार्थिव २०१८ मध्ये आपली शेवटची आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

Gujarat Titans: गुजरात टायटन्सचा मास्टरस्ट्रोक! ऑक्शनआधी दिग्गज खेळाडूचा संघात प्रवेश
IND vs AUS, Pitch Report: पहिल्या कसोटीआधी टीम इंडियासाठी बॅड न्यूज! पर्थमधून समोर आली मोठी अपडेट

पार्थिव पटेल गुजरातचाच खेळाडू आहे. त्यामुळे या संघातील खेळाडूंना त्याच्या अनुभवाचा चांगलाच फायदा होऊ शकतो. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला भारतीय संघासाठी २५ कसोटी,३८ वनडे आणि २ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने ९३४ धावा केल्या.

Gujarat Titans: गुजरात टायटन्सचा मास्टरस्ट्रोक! ऑक्शनआधी दिग्गज खेळाडूचा संघात प्रवेश
IND vs AUS: विराट की रोहित; ऑस्ट्रेलियात कोणाची बॅट तळपते? वाचा BGT मध्ये कसा राहिलाय दोघांचा रेकॉर्ड

यासह वनडे क्रिकेटमध्ये त्याने ७३६ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला ३६ धावा करता आल्या आहेत. त्याच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये ४ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला एकही शतक झळकावता आलेलं नाही.

गुजरातने या खेळाडूंना केलं रिटेन

आयपीएल २०२२ पासून हार्दिक पंड्या या संघाचा कर्णधार होता. पहिल्याच हंगामात त्याने या संघाला चॅम्पियन बनवलं. त्यानंतर दुसऱ्या हंगामात या संघाने फायनल गाठली होती. मात्र तिसऱ्या हंगामापूर्वी हार्दिकने या संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.

या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली. आगामी हंगामापूर्वी गुजरातने शुभमन गिल, राशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि शाहरुख खानला रिटेन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com