world cup Icc Twitter
Sports

World cup BAN vs SL: बांगलादेशनं इतिहास रचला; वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच श्रीलंकेला हरवलं

world cup : बांगलादेशच्या क्रिकेट संघाने श्रीलंकेला तीन विकेट पराभूत केलं.

Bharat Jadhav

World cup BAN vs SL:

नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर वर्ल्ड कपचा ३८ वा सामना आज बांगलादेश आणि श्रीलंकेच्या संघात झाला. वर्ल्ड कपच्या सामन्यात बांगलादेशच्या क्रिकेट संघाने पहिल्यांदा श्रीलंकेला पराभूत केलंय. श्रीलंकेने दिलेलं २८० धावांचा आव्हान बांगलादेशने ७ गडी गमावून २८२ धावा केल्या आणि सामना जिंकला. या पराभवासह श्रीलंकेचा संघ अधिकृतपणे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ( Latest News)

लंकेच्या संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने चांगली सुरुवात केली. दरम्यान सलामीवीर ५० धावांच्या आत बाद झाले. यानंतर मैदानावर आलेल्या शाकिब अल हसन आणि नझमुल हसन शांतो संयमी खेळ करत दोन्ही फलंदाजांनी शतकी भागीदारी केली. शाकिबने ८२ तर शांतोने ९० धावा केल्या. अँजेलो मॅथ्यूजने दोघांना तंबूत परत पाठवलं आणि श्रीलंकेच्या संघाचं सामन्यात दमदार पुनरागमन केलं. हा सामना खूप रोमांचकारी झाला. क्रिकेटप्रेमींच जीव टांगणीला लावणाऱ्या या सामन्यात अखेर बांगलादेशने विजय मिळवला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

श्रीलंकेने नाणेफेक गमावली होती. परंतु बांगलादेशन त्यांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. आमंत्रणाचा स्वीकार करत लंकेच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजाचा समाचार घेतला. लंकेने निर्धारित ५० षटकात २७९ धावा करत आणि बांगलादेशासाठी २८० धावांचे लक्ष्य दिले. श्रीलंकेकडून चारिथ असलंकाने १०८ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय पथुम निसांका आणि सदिरा समरविक्रमा यांनी श्रीलंकेसाठी ४१-४१ धावांची खेळी खेळली. याशिवाय धनंजय डी सिल्वाने ३४ धावा केल्या. या सामन्यात इज्लो मॅथ्यूजची विकेट खूपच वादग्रस्त ठरली.

दरम्यान वर्ल्डकपमधून बाहेर पडणारा पहिला संघ बांगलादेश होता. पण आता उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या लंकेच्या सर्व आशा संपुष्टात आल्यात. या मेगा स्पर्धेत दोन्ही संघाना आता प्रत्येकी एक-एक सामना खेळावा लागणार आहे. श्रीलंकेचा पुढील सामना न्यूझीलंडशी तर बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : भाजप आमदाराचा नवा लूक, नगरपालिकेत यश खेचून आणलं अन्..., वाचा नेमकं काय झालं

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

Railway Recruitment: रेल्वेत सर्वात मोठी भरती! २२००० पदांसाठी भरती; अट फक्त १० वी पास; अर्ज कसा करावा?

Mehandi Designs: नवरीच्या पायावर मेहंदी का काढतात?

Sugar Cookies Recipe: ख्रिसमससाठी खास, घरच्या घरी बनवा शुगर कुकीज, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT