वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आज बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना दिल्लीच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यावर वायु प्रदुषणाचे सावट असल्याने हा सामना रद्द केला जाऊ शकतो.
गेल्या चार दिवसांपासून दिल्लीत विषारी धुक्याचा दाट थर पसरला आहे. येत्या मंगळवारपर्यंत हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. फुफ्फुसरोग तज्ज्ञ रणदीप गुलेरीया यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये पाणी शिंपडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आयसीसीने हे पाऊल उचलल्यानंतर लगतच्या परिसरातील प्रदुषणाची पातळी कमी होण्यास मदत झाली आहे. (Latest sports updates)
दोन्ही संघांचे सराव सामने रद्द..
श्रीलंका आणि बांगलादेश या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी बांगलादेशच्या खेळाडूंनी आपले सराव सत्र रद्द केले. तर शनिवारी श्रीलंकेच्या खेळाडूंनी आपले सराव सत्र रद्द केले. श्रीलंकेच्या खेळाडूंनी शनिवारी इन्डोरमध्ये सराव केला. तर बांगलादेशच्या खेळाडूंनी रविवारी सराव केला.
बांगलादेशचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर श्रीलंकेचेही वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये जाण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. बांगलादेशला ७ सामन्यांपैकी केवळ १ सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर श्रीलंकेने ७ सामन्यांपैकी २ सामने जिंकले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.