विश्वचषक स्पर्धेत आज मंगळवारी झालेल्या ३१ व्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशलचा ७ गडी राखून पराभव केला. बांगलादेशचा पराभव केल्याने पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी आहे. (Latest Marathi News)
बांगलादेशला विश्वचषकात सहाव्या पराभवाला सामारे जावे लागले आहे. बांगलादेश संघ पराभूत झाल्याने गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे. तर पाकिस्तानने चार पराभवानंतर पहिला विजय मिळवला आहे.
कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात बांगलादेशने ४५.१ षटकात सर्वबाद २०४ धावा केल्या. पाकिस्तानने या आव्हानाचा पाठलाग करताना ३२.३ षटकात ३ गडी गमावून २०५ धावा करत बांगलादेशवर विजय मिळवला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीर फखर आणि अब्दुल्ला शफीकने धमाकेदार सुरुवात केली. पहिल्या पॉवरप्लेमधून पाकिस्तानने नाबाद ५२ धावा कुटल्या. फखर आणि अब्दुल्लाने पहिल्या विकेटसाठी १२७ चेंडूत १२८ धावा कुटल्या.
अब्दुल्ला शफीक ६९ चेंडूत ६८ धावांवर बाद झाला. तर कर्णधार बाबर आझम अवघ्या ९ धावांवर बाद झाला. फखर जमां हा ७४ चेंडूत ८१ धावा करत माघारी परतला. पाकिस्तानच्या संघाने ३२.३ षटकात ३ गडी गमावून २०५ धावा करत बांगलादेश संघाला धूळ चारली. पाकिस्तानसाठी शाहीन अफरीदी आणि मोहम्मद वसीम जूनियरने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.