IND vs SL: हार्दिकच्या जागी कोणाला संधी मिळणार? टीम इंडियाने आखला मास्टरप्लान, नेट्समध्ये सुरुये खास सराव

Hardik Pandya Replacement: हार्दिकची जागा भरून काढण्यासाठी भारतीय संघाचा खास प्लान सुरु आहे.
viral video
viral videoinstagram
Published On

Hardik Pandya Replacement:

भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत खेळलेल्या ६ पैकी ६ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. संघातील सर्व खेळाडू जोरदार कामगिरी करत असले तरी हार्दिक पंड्याची दुखापत भारतीय संघाची चिंता वाढवणारी बाब आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात तो गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे तो पुढील २ सामन्यात खेळताना दिसून आला नाही.

हार्दिकशिवाय भारतीय संघाने २ सामने जिंकले आहेत. मात्र भारतीय संघात एका गोलंदाजाची कमतरता स्पष्टपणे दिसून येत आहे. हार्दिक पंड्या बाहेर झाल्यानंतर रोहित शर्मा प्लेइंग ११ मध्ये २ मोठे बदल केले आहेत.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्यात आला. तर अतिरिक्त फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिलं गेलं. हे दोघेही आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडताना दिसून येत आहेत. मात्र तरीदेखील भारतीय संघात सहाव्या गोलंदाजाची करतरता जाणवतेय. (Latest sports updates)

हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. तो सेमीफायनलच्या सामन्यात कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. मात्र सेमीफायनलपूर्वी भारतीय संघाला ३ सामने खेळायचे आहेत. या ३ सामन्यांमध्ये सहाव्या गोलंदाजाची कमतरता पूर्ण करण्यासाठी रोहित सेना खास प्लान करण्याच्या तयारीत आहे.

सहाव्या गोलंदाजाची कमतरता भरून काढण्यासाठी विराट कोहली,सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल नेट्समध्ये सराव करताना दिसून आले आहेत . विराट कोहली यापूर्वी ही गोलंदाजी केली आहे. तर सूर्यकुमार यादवलाही आयपीएल स्पर्धेत गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. हे दोघे जर गोलंदाजी करू लागले तर भारतीय संघाचा सहाव्या गोलंदाजीचा प्रश्न सुटू शकतो.

भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये हे फलंदाज गोलंदाजी करताना दिसून आले आहेत.

viral video
IND vs ENG: बॉल ऑफ द वर्ल्डकप! कुलदीपनं शेन वॉर्न सारखाच बॉल फिरवत घेतली बटलरची विकेट; पाहा Video

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com