येत्या ५ ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सराव सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. पहिला सराव सामना बांगलादेश विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.
पहिल्याच दिवशी एकूण ३ सामने खेळवले जाणार आहेत. दुसरा सराव सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड तर तिसरा सराव सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.
भारतीय संघाचा पहिला सराव सामना ३० सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ इंग्लंड सोबत दोन हात करताना दिसून येणार आहे. हा सामना गुवाहाटीमध्ये खेळवला जाईल. तर दुसरा सराव सामना नेदरलँड संघासोबत रंगणार आहे. ३ सप्टेंबर रोजी खेळवला जाणारा हा सामना तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाईल.
वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी सर्व संघांना २-२ सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या आणि शेवटच्या दिवशी ३-३ सामने आयोजीत केले जाणार आहेत.
तर इतर दिवशी २-२ सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हैदराबाद, ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुवनंतपुरम आणि बारसापरा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटीच्या मैदानावर रंगणार आहेत. (Latest sports updates)
केव्हा होणार स्पर्धेला सुरुवात?
तब्बल १२ वर्षांनंतर वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन भारतात केले जाणार आहे. ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाईल.
हा सामना जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. तर अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. हा सामना देखील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. तर भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.