भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकप काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याचदरम्यान, विश्वचषकातील टीम इंडियाच्या संघाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाच्या संघातून अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हा दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. तर अक्षर पटेलच्या जागी संघात फिरकीपटू आर. अश्विनला संधी मिळाली आहे. (Latest marathi News)
वर्ल्डकपच्या टीम इंडियाच्या संघात आर अश्विनला संधी मिळाली आहे. अश्विनला संघात स्थान मिळाल्याने त्याचं नशीब उजळलं आहे. अश्विनला संघात अचानक एन्ट्री मिळाली आहे. आशिया कपदरम्यान टीम इंडियाचा अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे अक्षर पटेल वर्ल्डकपमधून बाहेर गेला आहे. अक्षरच्या जागी आता संघात अश्विनला संधी मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या विरोधात मालिकेआधी अश्विनने शेवटचा वनडे सामना जानेवारी २०२२ मध्ये खेळला होता. त्यानंतर अश्विन तब्बल दीड वर्षांच्या कालावधीनंतर टीम इंडियासाठी सामना खेळला. अश्विनची ऑस्ट्रेलिया विरुद्ध फिरकी चांगलीच चालली. अश्विनने २ सामने खेळले. त्याने मालिकेत एकूण ४ गडी बाद केले.
वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या संघात अश्विनच्या ऐवजी अष्टपैलू वाशिंगटन सुंदरच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, वर्ल्डकपमध्ये संघात अश्विनच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
टीम इंडियाचा पहिला सामना कधी?
वनडे वर्ल्ड कप २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघासोबत भारताचा पहिला सामना होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना ८ ऑस्टोबर रोजी चेन्नईमध्ये होणार आहे. तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याचबरोबर १६ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका असा सामना होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.