World Cup Final 2023 Pitch Rating X/ICC
Sports

World Cup 2023: वर्ल्डकप सेमीफायनल- फायनलसह ICC ने या ५ सामन्यातील खेळपट्ट्यांना दिली सरासरी रेटिंग;पाहा यादी

World Cup Final 2023 Pitch Rating: ही स्पर्धा होऊन ३ आठवडे होऊन गेली आहेत. दरम्यान आयसीसीने भारतीय खेळपट्ट्यांना रेटिंग दिली आहे.

Ankush Dhavre

World Cup Final 2023 Pitch Rating:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचे आयोजन भारतात करण्याता आले होते. या स्पर्धेत यजमान भारतीय संघाने सर्व ९ सामने जिंकून सेमीफायनलचा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. मात्र अंतिम फेरीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. ही स्पर्धा होऊन ३ आठवडे होऊन गेली आहेत. दरम्यान आयसीसीने भारतीय खेळपट्ट्यांना रेटिंग दिली आहे. (ICC Pitch Rating)

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील अंतिम सामन्यासह ५ अशा खेळपट्ट्या आहेत ज्यांना आयसीसीने सरसरी रेटिंग दिली आहे. तर २ खेळपट्ट्यांना बीसीसीआयने चांगली रेटिंग दिली आहे. माध्यमातील रिपोर्टनुसार, आयसीसीने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील (Narendra Modi Stadium) खेळपट्टीला सरासरी रेटिंग दिली आहे.

याच खेळपट्टीवर वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना खेळवण्यात आला होता. तर कोलकाताच्या इडन गार्डन्सवरील (Eden Gardens) खेळपट्टीलाही सरासरी रेटिंग दिली आहे. या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या उपांत्यफेरीचा सामना खेळवण्यात आला होता.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टीची रेटिंग आयसीसीचे सामनाधिकारी आणि झिम्बाब्वेचे माजी फलंदाज अँडी पायक्रॉफ्ट यांनी दिली होती. तर कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमच्या खेळपट्टीची रेटिंग भारताचे माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ यांनी दिली होती.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला २४० धावा करता आल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सोपा विजय मिळवला होता. तर दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेला २१२ धावा करता आल्या होत्या. या धवांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. (Latest sports updates)

आयसीसीने स्पर्धेतील ११ पैकी ५ सामन्यांना सरासरी रेटिंग दिली आहे. अंतिम सामना आणि उपांत्य फेरीतील सामन्यासह, अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध, लखनऊमध्ये इंग्लंडविरुजद्ध, चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग देण्यात आली आहे.

स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवण्यात आला होता. ही खेळपट्टी वादग्रस्त ठरली होती. कारण सामन्यापूर्वी खेळपट्टी बदलली गेली आहे, असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान या खेळपट्टीला आयसीसीने चांगली रेटिंग दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT