World cup : Saam ICC Twitter
Sports

World cup : इब्राहिमची विक्रमी खेळी; ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर २९२ धावांचं लक्ष्य

world cup : आफगाणिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघासमोर २९२ धावांचे आव्हान दिले आहे.

Bharat Jadhav

World Cup 2023:

आज मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघात सामना होत आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटच्या जगात सगळ्यात बलवान संघ मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघासमोर अफगाणच्या पठाणांनी संयमी खेळी करत २९१ धावा केल्या. आता ऑस्ट्रेलियालाला निर्धारित ५० षटकात २९२ धावा करायच्या आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या संघाने वर्ल्ड कपच्या इतिहासात इतक्या मोठ्या धावसंख्येचं आव्हान पार केलं नाहीये. (Latest News)

प्रथम फलंदाजी करताना आफगाणिस्तानच्या संघाने सतर्क खेळी केली. मात्र रहमानुल्लाह गुरबाज २१ धावा करून बाद झाला. जोश हेजलवुडने त्याला बाद केलं. परंतु जादरानने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीचा निर्णय योग्य ठरवत फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर दमदार खेळ दाखवत नाबाद राहत मोठी धावसंख्या उभारण्यात मोठी भूमिका निभावली. जादरानने आपल्या कारकीर्दमधील पाचवं शतक झळकावलं. वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू तो ठरला. याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावणारा तो आफगाणिस्तानचा पहिला फलंदाज ठरलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान जादरान आणि रहमत शाह यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०० चेंडूमध्ये ८३ धावांची भागीदारी केली. मधल्या षटकांमध्ये अजमतुल्ला उमरझाईने १८ चेंडूत दोन षटकार आणि एक चौकारासह २२ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पा याने बाद केलं. आफगाणिस्तानच्या संघाने अखेरच्या पाच षटकांत ६४ धावा जोडत ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर मोठी धावसंख्या उभी केली.

राशिद खानने डेथ ओव्हर्समध्ये शानदार फलंदाजी करत १८ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल करण्यात आले आहेत. स्टीव स्थिम हा जखमी झाल्यामुळे संघाबाहेर गेलाय. तर कॅमरन ग्रीनच्या जागेवर ग्लेन मॅक्सवेलला खेळवण्यात आले आहे. तर अफगाणिस्तानच्या संघात फजलहलक फारुकीच्या जागेवर नवीनुल हकला खेळण्यासी संधी मिळालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs fortune: 24 डिसेंबरचा दिवस ठरणार करिअर टर्निंग पॉइंट? ‘या’ 4 राशींचं नशीब चमकणार

Tirgrahi Yog: 200 वर्षांनी मकर संक्रातीला बनणार त्रिग्रही राजयोग; या राशींच्या व्यक्तींना मिळणार धनदौलत आणि राजेशाही सुख

Thackeray Brothers : महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण! आज दुपारी 12 वाजता घोषणा, ठाकरे बंधूंची युती कुठे कुठे होणार?

New Rules 2026: १ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते शेतकऱ्यांवर होणार परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

SCROLL FOR NEXT