Ind Vs SL: अमरावतीचा पोरगा करणार भारतीय क्रिकेट संघात पदार्पण, पाहा कोण आहे तो खेळाडू?

पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा यष्टीरक्षक संजु सॅमसनला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी नव्या यष्टीरक्षकाला संधी देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे हा खेळाडू महाराष्ट्रातील अमरावतीचा आहे.
IND vs SL 1st T20
IND vs SL 1st T20 Saam Tv
Published On

Ind Vs SL T20 Siries: भारत आणि श्रीलंका (Srilanka) यांच्यामध्ये होणारा दुसरा टी ट्वेंटी सामना आज पुण्यामधील गहुंजे मैदानावर रंगणार आहे. पहिल्या सामन्यात दोन धावांनी विजय मिळवलेल्या भारतीय संघाने या मालिकेत आघाडी घेतली असून , आजचा सामना जिंकून मालिका विजयाच्या निर्धाराने टीम इंडिया मैदानात उतरेल.

मात्र पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा यष्टीरक्षक संजु सॅमसनला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी नव्या यष्टीरक्षकाला संधी देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे हा खेळाडू महाराष्ट्रातील अमरावतीचा आहे.

IND vs SL 1st T20
Ind vs Pak : ठरलं तर...; टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने, सामने किती आणि कधी होणार?

टीम इंडियात पदार्पण करणारा हा महाराष्ट्राचा खेळाडू या आधी देशांतर्गत तसेच आयपीएलमध्येही खेळला आहे. या खेळाडूचे नाव आहे जितेश शर्मा. संजू सॅमसन ऐवजी भारतीय संघात संधी देण्यात आलेला जितेश २९ वर्षांचा असून तो रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भाकडून खेळतो. तो मुळचा अमरावतीचा आहे.

जितेशने आयपीएलमध्ये (IPL) पंजाब किंग्जकडून खेळत उत्तम फलंदाजी केली होती. आता जितेश श्रीलंकेसोबतच्या दोन सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com