AUS vs AFG: इब्राहिम जदरानने रचला इतिहास! WC मध्ये शतक झळकावणारा ठरला अफगाणिस्तानचा पहिलाच फलंदाज

Ibrahim Zadran: या सामन्यात इब्राहिम जदरानने इतिहास रचला आहे.
Ibrahim Zadran
Ibrahim Zadrantwitter
Published On

Ibrahim Zadran Century:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३९ वा सामना अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान प्रथम फलंदाजी इब्राहिम जदरानने तुफानी खेळी करत शतक झळकावले आहे. यासह त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

या सामन्यात इब्राहिम जदरानने १३१ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. यासह तो अफगाणिस्तानसाठी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत शतकी खेळी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा अफगाणिस्तानच्या कुठल्याच फलंदाजाला करता आला नव्हता.

मुख्य बाब म्हणजे त्याने हे शतक ५ वेळचा वर्ल्डकप विजेता संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले आहे. त्याने मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि हेजलवूडसारख्या टॉप क्लास गोलंदाजांचा सामना करत हे शतक पूर्ण केलं आहे. इब्राहिम जदरानने या डावात १४३ चेंडूंचा सामना करत १२९ धावांची खेळी केली.. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि ३ षटकार मारले. (Latest sports updates)

अफगाणिस्तानने उभारला २९१ धावांचा डोंगर..

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने या सामन्यात ५० षटक अखेर ५ गडी बाद २९१ धावांचा डोंगर उभारला आहे. अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना इब्राहिम जदरानने सर्वाधिक १२९ धावांची खेळी केली.

तर राशिद खानने नाबाद ३५ धावांची तुफानी खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. रहमानुल्लाह गुरबाजने २१ धावांची खेळी केली. तर रहमत शाहने ३०, कर्णधार शाहीदीने २६ आणि ओमरजाईने २२ धावांची खेळी केली.

Ibrahim Zadran
Angelo Mathews Statement: शाकिबचं कृत्य लज्जास्पद ! सामन्यानंतर अँजेलो मॅथ्यूज संपूर्ण संघावर गरजला,म्हणाला...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com