वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३९ वा सामना अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे.
हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग ११ मध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात.
या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात ग्लेन मॅक्सवेलचं पुनरागमन होऊ शकतं. या सामन्यापूर्वी त्याने नेट्समध्ये कसून सराव केला आहे. संघातील विस्फोटक फलंदाज मिचेल मार्श मायदेशी परतला होता.
मात्र तो या सामन्यात कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. या सामन्यात ट्रेविस हेड आणि डेव्हिड वॉर्नरची जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. स्टीव्ह स्मिथ किंवा मार्नस लाबुशेन या दोघांपैकी एकाला संघात स्थान दिले जाऊ शकते.
अफगाणिस्तानचा संघ फिरकी गोलंदाजीवर जोर देताना दिसून येऊ शकतो. त्यामुळे राशिद खान आणि मुजीब उर रहमान प्लेइंग ११ चा भाग असतील. या सामन्यात इब्राहिम आणि गुरबाज डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात.
अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत ८ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. या संघाने आतापर्यंत ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत. जर अफगाणिस्तानला सेमीफायनलमध्ये जायचं असेल तर हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. (Latest sports updates)
या सामन्यासाठी अशी असू शकते ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:
डेव्हिड वॉर्नर, ट्रेविस हेड, मिशेल मार्श, स्टीव स्मिथ/मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, पॅट कमिंस (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेजलवुड.
अशी असू शकते अफगाणिस्तानची प्लेइंग ११:
रहमानुल्लाह गुरबाज़, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्लाह उमरजई, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी, नूर अहमद
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.