rohit sharma twitter
क्रीडा

IND vs AUS Final: नाद करा पण हिटमॅनचा कुठं! अर्धशतक हुकलं पण वर्ल्डकप स्पर्धेत असा रेकॉर्ड करणारा ठरलाय पहिलाच कर्णधार

Ankush Dhavre

Ind vs Aus, World Cup 2023 Final:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर १.३० लाखांहून अधिक क्रिकेट चाहत्यांनी हजेरी लावली आहे. दरम्यान या सामन्यात रोहितचं अर्धशतक हुकलं असलं तरी त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

रोहितचा मोठा विक्रम..

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर यजमान भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली.

या सामन्यात रोहितने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो ३१ चेंडूंचा सामना करत ४७ धावा करत माघारी परतला. यादरम्यान तो एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला आहे. (Latest sports updates)

वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार..

रोहित शर्माने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दमदार खेळ केला आहे. त्याने मोठी खेळी केली नसली तरीदेखील त्याने सुरुवातीच्या षटकांमध्ये विरोधी संघातील गोलंदाजांवर आक्रमण करत भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन दिली आहे. या सामन्यातही त्याने ताबडतोड ४७ धावा कुटल्या. यासह त्याने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत ५९७ धावा कुटल्या आहेत. या बाबतीत त्याने केन विलियम्सन आणि महेला जयवर्धनेला मागे सोडलं आहे.

एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे कर्णधार

रोहित शर्मा (भारत) - ५९७ धावा* (२०२३)

केन विलियम्सन (न्यूझीलंड) - ५७८ धावा (२०१९)

महेला जयवर्धने (श्रीलंका) - ५४८ धावा (२००७)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT