क्रीडा

Ind vs Nz: टीम इंडिया सहज जिंकेल? वानखेडेवर धावांचा पाठलाग करणं कठीण, आकडे पाहून व्हाल हैराण

Ind vs Nz: भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तिसरा आणि शेवटचा टेस्ट सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जातोय. मात्र वानखेडेच्या मैदानावर रन चेज करणं कठीण असल्याचं इतिहास सांगतो.

Surabhi Jagdish

भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये तिसरा आणि शेवटचा टेस्ट सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जातोय. या सामन्यात न्यूझीलंडचा दुसरा डाव संपुष्टात आला असून टीम इंडियाला जिंकण्यासाठी १४७ रन्सची गरज आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस असून टीम इंडिया सहज हा सामना जिंकेल असं चाहत्यांना वाटतंय. मात्र वानखेडे स्टेडियममध्ये रन चेज करणं सोपी गोष्ट नाहीये.

वानखेडेमध्ये असं एकदाच घडलंय

या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया मैदानावर आल्यानंतर लगेच एक विकेट काढली. यामुळे टीम इंडियाला १४७ रन्सचं लक्ष्य मिळालं आहे. या सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात 235 रन्स केले. यावेळी टीम इंडियाने पहिल्या डावात 263 रन्स केले. म्हणजेच पहिल्या डावाच्या जोरावर भारतीय टीम इंडियाला 28 रन्सची आघाडी मिळाली.

मात्र, वानखेडे स्टेडियमवर चौथ्या डावात टीम इंडियासाठी १४७ रन्सचा पाठलाग करणं काहीसं कठीण असणार आहे. वानखेडे स्टेडियममध्ये रन चेस करणं खूप कठीण मानलं जातं. शिवाय याची आकडेवारी पाहिली तर ती देखील धक्कादायक आहे. या मैदानावर टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त एकदाच १०० हून अधिक रन्स यशस्वीपणे चेस करता आले आहे. 2000 दक्षिण आफ्रिकेने ही कामगिरी केली होती.

दक्षिण आफ्रिकेच्या टीमने भारतासमोर १६३ रन्सचं लक्ष्य सहा विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं. त्यामुळे आता टीम इंडियाला विजयासाठी २४ वर्षांच्या जुन्या विक्रमाची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाने यापूर्वी केवळ एकदाच लक्ष्याचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता.

टीम इंडिया रचणार का इतिहास?

आतापर्यंत वानखेडेच्या मैदानावर टेस्ट क्रिकेटमध्ये एखाद्या टीमने यशस्वी पाठलाग केल्याच्या केवळ पाच घटना आहेत. आता टीम इंडियाला विजय मिळवायचा असेल, तर त्यांच्या फलंदाजांना चौथ्या डावात दमदार कामगिरी दाखवावी लागेल. हे पीच स्पिनर्ससाठी अनुकूल असल्याने किवी फिरकीपटू एजाज पटेल आणि ईश सोधी यांच्याविरुद्ध भारतीय फलंदाजांना सावध फलंदाजी करावी लागणार आहे.

वानखेडे स्टेडियममध्ये रन चेज (टेस्ट क्रिकेट)

  • 164/6 दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (2000)

  • 98/0 इंग्लंड विरुद्ध भारत (1980)

  • 58/0 इंग्लंड विरुद्ध भारत (2012)

  • 51/2 भारत विरुद्ध इंग्लंड (1984)

  • 47/0 ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (2001)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chalisgaon News : निकालापूर्वी चाळीसगावात झळकले विजयाचे बॅनर; आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Ratnagiri Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT