Sarfaraz Khan: फुल ऑन राडा! किवी फलंदाजाकडून सरफराजची तक्रार; मग रोहितने जे केलं... -VIDEO

IND vs NZ, 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यातील पहिल्याच दिवशी असं काही घडलं, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
rohit sharma
rohit sharmatwitter
Published On

Sarfaraz Khan, Ind vs NZ 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. दरम्यान पहिल्याच दिवशी एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या सरफराज खानला अंपायरने चेतावणी दिली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

या मालिकेत भारतीय संघ २-० ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. भारतीय संघाने मायदेशात खेळताना यापूर्वी कधीच सलग ३ सामने गमावलेला नाही.

त्यामुळे भारतीय खेळाडू पूर्ण जोर लावताना दिसून येत आहेत. हा सामना सुरू असताना अंपायर सरफराज खानला चेतावणी देताना दिसून आले. यासह त्याची तक्रार अंपायरकडेही केली.

पहिल्या डावातील ३२ वे षटक सुरू होण्यापूर्वी अंपायर आणि रोहित शर्मा यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. सरफराज खान फलंदाजाच्या अगदी जवळ उभा राहून क्षेत्ररक्षण करतो. क्षेत्ररक्षण करत असताना तो फलंदाजाला काहीतरी बोलत होता.

rohit sharma
IND vs NZ: जडेजाने एकाच ओव्हरमध्ये फिरवली मॅच; न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत -VIDEO

न्यूझीलंडच्या फलंदाजाने केली तक्रार

सरफराज खान इतकं काही बोलत होता, की न्यूझीलंडचा फलंदाज डॅरील मिशेलला एकाग्र होऊन खेळता येत नव्हतं. त्यामुळे त्याने अंपायरकडे तक्रार केली. त्यावेळी रोहित शर्मा त्याच्या बचावासाठी पुढे आला. यासह विराट कोहलीही त्याचा बचाव करण्यासाठी पुढे आला. या तिघांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती.

rohit sharma
Rishabh Pant: शतक हुकलं पण इतिहास रचला! अर्धशतक झळकावताच रिषभने दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड मोडला

न्यूझीलंडचा डाव आटोपला

पहिल्या दिवशी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून डॅरील मिशेलने सर्वाधिक ८२ धावांची खेळी केली. तर विल यंगला ७१ धावा करता आल्या. न्यूझीलंडचा डाव २३५ धावांवर आटोपला. भारताकडून गोलंदाजी करताना वॉशिग्टंन सुंदरने ४ तर रविंद्र जडेजाने ५ गडी बाद केले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com