Team India: न्यूझीलंड सिरीजमध्ये 'हा' खेळाडू राखू शकतो टीम इंडियाची लाज; BCCI घेणार का मोठा निर्णय?

Team India: टीम इंडियाची मिडल ऑर्डर खूपच कमकुवत असल्याने भारताला आपल्या एका मॅचविनिंग बॅट्समनची उणीव भासतेय. अशातच टीम इंडिया जुन्या एका खेळाडूचा नक्कीच विचार करू शकते.
Ajinkya rahane
Ajinkya rahanesaam tv
Published On

न्यूझीलंडविरूद्धची टेस्ट सिरीज टीम इंडियाने गमावली. बंगळूरूनंतर पुण्यात खेळला गेलेला टेस्ट सामनाही टीम इंडियाने गमावला. यामुळे न्यूझीलंड २-० अशी टेस्ट सिरीज गमावली. किवींच्या गोलंदाजीसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. टीम इंडियाची मिडल ऑर्डर खूपच कमकुवत असल्याने भारताला आपल्या एका मॅचविनिंग बॅट्समनची उणीव भासतेय. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना टीम इंडियाच्या भल्यासाठी या फलंदाजाला परत आणावं लागू शकतं.

टीम इंडियासाठी फायदेशीर ठरेल हा खेळाडू

न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सिरीजमधून धडा घेत टीम मॅनेजमेंटने अजिंक्य रहाणेचा पुन्हा टीममध्ये समावेश केला पाहिजे. अजिंक्य रहाणे हा असा फलंदाज आहे की जो कठीण परिस्थितीतही तो क्रीजवर उभा राहतो. अजिंक्य रहाणेने टीम इंडियासाठी शेवटचा टेस्ट सामना जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळला होता.

Ajinkya rahane
Virat Kohli: वॉटर बॉक्सवर जोरात बॅट आदळली आणि...; विकेट गमावल्यानंतर विराट कोहलीला राग अनावर, Video व्हायरल

अजिंक्य रहाणेने भारतासाठी आतापर्यंत 85 टेस्ट सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 38.46 च्या सरासरीने 5077 रन्स केले आहेत. अजिंक्य रहाणेने आपल्या टेस्ट कारकिर्दीत 12 शतके आणि 26 अर्धशतकं झळकावलीयेत. जुलैच्या या सामन्यानंतर अजिंक्य रहाणे टीम इंडियातून जणू गायबच झाला.

अजिंक्य रहाणे आता 36 वर्षांचा झाला असून तो टीम इंडियासाठी अजूनही फायदेशीर ठरून शकतो. अजिंक्य रहाणेने 22 मार्च 2013 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केलं होतं. २०२१ मध्ये झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान अजिंक्य रहाणेने केवळ फलंदाजीचं नाही तर कर्णधारपद सांभाळून सिरीजही भारताच्या नावे केली होती.

Ajinkya rahane
Ind vs Aus: ऑस्ट्रेलियाचं काही खरं नाही; बॉर्डर - गावसकर ट्रॉफीत टीम इंडिया या तगड्या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

२२ नोव्हेंबरपासून बॉर्डर गावसकर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या सिरीजमध्ये अजिंक्य रहाणेच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. या सिरीजमध्ये ५ टेस्ट सामन्यांच्या सिरीजसाठी आमने-सामने येणार आहेत. या सिरीजमध्ये टीम इंडियाने गेल्या दोन स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला त्याच्याच मैदानावर पराभवाची चव चाखायला लावली. त्यामुळे यंदाची ही सिरीज कोण जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com