Gautam Gambhir saam tv
Sports

Gautam Gambhir: मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची होणार हकालपट्टी? अखेर BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिलं उत्तर

भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक अफवा पसरल्या होत्या. काही माध्यमांनी बीसीसीआय गंभीर यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची नियुक्ती होणार असल्याचं म्हटलं होतं.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही दिवसांपासून गौतम गंभीरची हेड कोच पदावरून हकालपट्टी करणार अशी चर्चा रंगली होती. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये झालेल्या पराभवानंतर पत्करल्यानंतर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम फेरीत खेळू शकला नाही. त्यानंतरही टीम इंडियाची टेस्टमधील खराब कामगिरी सुरूच आहे. यामुळे गौतम गंभीरला कोच पदावरून काढून टाकण्यात येणार असल्याच्या. दरम्यान यावर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्टीकरण दिलंय.

BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सोडलं मौन

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी गौतम गंभीरला मुख्य कोच पदावरून हटवलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. नव्या कोचबाबत कोणचाही विचार नसल्याचं राजीव शुक्ला यांनी म्हटलंय.

एएनआयशी बोलताना ते म्हणाले, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबद्दल माध्यमांमध्ये पसरणाऱ्या अफवांवर मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनीही स्पष्टपणे सांगितलंय की. गौतम गंभीरला काढून टाकण्याचा किंवा टीम इंडियासाठी नवीन मुख्य कोच नियुक्त करण्याचा कोणतीही विचार नाही."

गौतम गंभीरच्या हकालपट्टीबाबत बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. ते म्हणाले होते की, पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. सैकिया यांनी गंभीरच्या हकालपट्टीच्या अफवांना पसरवणाऱ्या मीडिया एजन्सींवरही टीका केली. बीसीसीआयच्या सचिवांनी स्पष्ट केलेलं की, गौतम गंभीरच्या काढून टाकण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही.

दरम्यान आतातरी सध्या टीम इंडियासमोर टी-२० वर्ल्डकपचं आव्हान आहे. टीम इंडियाने २०२४ चा टी-२० वर्ल्डकप जिंकला होता आणि आता या फॉर्मेटमध्ये टीम इंडियाला पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन बनायचंय. यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारत आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केलाय. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajwain Leaf Pakoda: ओव्याच्या पानांची कुरकुरीत भजी कशी बनवायची?

Nagpur: नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले, उमेदवारी न मिळाल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांचा राडा; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक आखाड्यात तृतीयपंथी उमेदवार

Stomach diseases: रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका, वाचा डॉक्टरांनी काय म्हणाले?

Reels Addiction: दारू-सिगारेटपेक्षा रील्स लय बेक्कार, डोक्यावर ५ पट होतो परिणाम, वाचा तज्ज्ञांनी काय दिला इशारा

SCROLL FOR NEXT