Cricketers on pahalgam terror attack saam tv
Sports

Pahalgam terror attack: किंमत मोजावी लागणार...! पहलगाव दहशतवादी हल्ल्यावर क्रिकेट खेळाडू संतापले

Cricketers on pahalgam terror attack: मंगळवारी जम्मू-काश्मिरमध्ये मोठी घटना घडली. या हल्ल्यामध्ये जवळपास २८ जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी ३ वाजताच्या आसपास हा हल्ला झाल्याची माहिती आहे.

Surabhi Jayashree Jagdish

जम्मू काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरलं आहे. या भ्याड हल्ल्यामध्ये आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे भारतातील प्रत्येक नागरीक धक्क्यात आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये बैसरन पर्वतावर फिरायला गेलेल्या पर्यटकांवर मंगळवारी दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला.

संपूर्ण देशरातून या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशातच क्रिकेट जगतातून देखील खेळाडूंनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दहशतवादी हल्ल्यावर टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर, खेळाडू शुभमन गिल, माजी खेळाडू पार्थिव पटेल आणि हरभजन सिंह यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणाऱ्या शुभमन गिलने पोस्ट करत म्हटलंय की, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल ऐकून फार दुःख झालं आहे. पिडीत आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मी प्रार्थना करेन. अशा पद्धतीच्या हिंसेला आपल्या देशात कोणतंही स्थान नाही.

टीम इंडियाचा माजी क्रिकेकर आणि वर्तमान कोच गौतम गंभीर या हल्ल्यावरून संतप्त झाला आहे. गंभीरने या हल्ल्याची निंदा करत लिहिलंय की, मृतकांच्या कुटुंबासाठी मी प्रार्थना करतो. यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना आता किमत मोजावी लागणार आहे. आता भारत हल्ला करणार.

हरभजन सिंगने सोशल मीडियावर लिहिलंय की, या हल्ल्यात ज्या कुटुंबांनी आपला जीव गमावला आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करेन. हल्लेखोरांना माफ केलं जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या जावयावर उधळल्या नोटा

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, १० तोळे सोनं ७१०० रुपयांनी वाढले, २२ -२४ कॅरेटचा आजचा भाव किती?

Leopard Attack : आई- बाबांसोबत शेकोटी घेत होता; दबा धरून बसलेल्या बिबट्याने अलगद उचलून नेला; ४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Bigg Boss Marathi Reunion Party : 'बिग बॉस मराठी'ची रंगली रियुनियन पार्टी; भन्नाट गाण्यावर थिरकले कलाकार, पाहा VIDEO

Blood Pressure कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा? अनुभवी डॉक्टरांनी दिल्या ४ महत्वाच्या टिप्स, लगेचच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT