CAB wants to ban Harsha Bhogle and Simon Doull saam tv
Sports

IPL 2025 : खेळपट्टीबाबत तक्रार करणं पडणार महागात? 'या' दोघांवर बंदी घाला; बीसीसीआयला पत्र लिहून केली मागणी

CAB wants to ban Harsha Bhogle and Simon Doull: आयपीएल सुरु झाल्यापासून ईडन गार्डन्सच्या पीचबाबत तक्रार करण्यात आली होती. दरम्यान यावरून दोन कमेंटटर्सवर बंदी घाला अशी मागणी करण्यात आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएलमध्ये नवा वाद होण्याची शक्यता आहे. यामध्ये बंगाल क्रिकेट संघाने बीसीसीआयकडे मागणी केली की, कोलकाता नाईट रायडर्सच्या घरच्या सामन्यांमध्ये कमेंटेटर हर्षा भोगले आणि सायमन डूल यांच्यावर बंदी घालण्यात यावी. संघाने बीसीसीआयला यासंदर्भात पत्र लिहिलंय. बंगाल क्रिकेट असोसिएशनने ही मागणी करण्याचं कारण म्हणजे दोन्ही कमेंटेटर्सने केकेआरला घरच्या मैदानावर फायदा न मिळाल्याबद्दल ईडन गार्डन्सच्या पिच क्युरेटरला दोषी ठरवलं. शिवाय यावेळी त्यांनी सुजान मुखर्जीवर जोरदार टीका केली होती.

अनेक रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात येतोय की, सुजन मुखर्जीला सीएबीकडून पूर्ण पाठिंबा दिला जातो. सीएबीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यांना देण्यात आलेल्या नियमांचं ते पालन देखील करतात.

दरम्यान या प्रकरणी संघाने बीसीसीआयला पत्र लिहिल्याने ही गोष्ट चर्चेत आली आहे. यावेळी बीसीसीआय या प्रकरणी काय एक्शन घेते का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

काय म्हणाले होते हर्षा भोगले?

हर्षा भोगले आणि सायमन डूल यांनी असं काय म्हटलं होतं ज्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे ते जाणून घेऊया. सायमन डूल आणि हर्षा भोगले म्हणाले होते की, ईडन गार्डन्समध्ये क्युरेटर होम टीमला सपोर्ट करत नाही. त्यामुळे केकेआरचाल कर्णधार अजिंक्य रहाणेला नवं घरचं ( स्थानिक ) मैदान शोधलं पाहिजे.

कोलकात्याचा अजून एक पराभव

दरम्यान अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सला अजून एका पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सोमवारी गुजरात टायटन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकात्याचा ३९ रन्सने पराभव झाला. सध्या सर्वाधिक रन्स आणि विकेट्ससाठी देण्यात येणाऱ्या पर्पल आणि ऑरेंज कॅप सध्या गुजरातच्या खेळाडूंकडे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

SCROLL FOR NEXT