
शुभमन गिल सध्या टीम इंडियाचा सर्वात चर्चेत असणारा खेळाडू आहे. टॅलेंटेड आणि हँडसम असणार्या या खेळाडूच्या मागे अनेक मुली फिदा आहेत. मधल्या काळात शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर डेट करत असल्याचा चर्चा रंगल्या होत्या. अशातच शुभमनच्या लग्नाबाबत एक किस्सा समोर आला आहे.
सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यापूर्वी टॉसच्या वेळी डॅनी मॉरिसनने गिलला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. त्यामुळे आता पुन्हा एकदा गिलच्या लग्नाची चर्चा रंगू लागली आहे.
टॉस दरम्यान डॅनी मॉरिसनने गिलला विचारलं की, तू छान दिसतोय, लग्नाचा काही प्लॅन आहे का? मॉरिसनच्या या प्रश्नाला उत्तर देताना गिल म्हणाला की, नाही, अजून तरी असा काहीही बेत आखलेला नाही. मात्र हे उत्तर देताना शुभमन गिला काही लाजला असल्याचं कॅमेरात कैद झालं.
शुभमन गिलच्या डेटिंगच्या अनेक अफवा आतापर्यंत पसरल्या आहेत. मात्र यावर खुलेपणाने कधीही गिल बोलला नाही. गेल्या काही महिन्यांपासून टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरचं नाव शुभमन गिलसोबत जोडलं जातंय.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे सामना पाहण्यासाठी अवनीत कौर दुबईमध्ये पोहोचली होती. त्यानंतर शुभमन आणि अवनीत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातंय. यापूर्वी सारा अली खान आणि सारा तेंडुलकर यांच्याशी देखील शुभमनचं नाव जोडलं गेलं होतं. काही दिवसांपूर्वीच सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचंही समोर आलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.