Morne Morkel on Jasprit Bumrah Injury saam tv
Sports

Jasprit Bumrah Injury: बुमराह पुढचे सामने खेळणार का? गोलंदाजी कोच मॉर्नी मॉर्केलने दुखापतीबाबत दिली मोठी अपडेट

Morne Morkel on Jasprit Bumrah Injury: ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखपतग्रस्त झाल्याचं दिसून आलं. दरम्यान बुमराहच्या दुखापतीबाबत गोलंदाजी कोच मॉर्केलने माहिती दिलीये.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येतेय. यावेळी एडलेडच्या मैदानात दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. मात्र या सामन्यात टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखपतग्रस्त झाल्याचं दिसून आलं.

पिंक बॉल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाली. बुमराहला वेदना होत असल्याचं पाहून टीम इंडियाचे चाहते मात्र चिंतेत पडले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही यावेळी काळजीत दिसून आला. अशातच आता टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत अपडेट दिलेत.

बुमराहची दुखापत किती गंभीर?

शनिवारी ॲडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला गोलंदाजी करताना त्याच्या स्नायूंमध्ये ताण जाणवत होता, परंतु गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल म्हणाले की, हा फक्त एक क्रॅम्प आहे आणि वेगवान गोलंदाज पूर्णपणे फीट आहे.

एडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या पिंक बॉल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या डावातील ८१वं ओव्हर टाकताना जसप्रीत बुमराहला दुखापत जाणवू लागली. यानंतर फिजिओची टीम मैदानात आली आणि बुमराहशी बोलून त्याच्यावर तातडीने उपचार करू लागली. या उपचारांनंतर बुमराहने लगेच गोलंदाजी करण्यास सुरुवातही केली. मात्र सिरीजच्या उर्वरित सामन्यांमध्ये बुमराह खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

मोर्ने मोर्कलने काय सांगितलं?

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल पत्रकारांना माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, "जसप्रीत बुमराह पूर्ण फीट आहे. त्याच्या पायात फक्त एक क्रॅम्प आला होता. त्यानंतर त्याने गोलंदाजी केली आणि विकेट्सही घेतल्या हे तुम्ही पाहिले असेल."

एडलेड टेस्टमध्ये भारत पराभवाच्या छायेत

या टेस्टच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 180 रन्सवर माघारी परतली होती. यावेळी प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 337 रन्स केले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने झंझावाती शतक ठोकलं. त्याच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 157 रन्सची मोठी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाज फ्लॉप ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT