WTC Points Table: प्रत्येक सामन्यानंतर धाकधूक वाढणार; भारतासाठी WTC ची फायनलचं समीकरण नेमकं कसं, पाहा!

WTC Points Table: पर्थ टेस्ट सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला WTC फायनलमध्ये सहज पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-0 असा विजय आवश्यक होता. आता टीम इंडियासाठी हे समीकरण कसं आहे पाहूयात
WTC Points Table
WTC Points Tablesaam tv
Published On

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या ठिकाणी ५ सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जाणार आहे. यामधील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला असून दुसरा सामना ६ डिसेंबर रोजी रंगणार आहे. दरम्यान आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागलीये ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची.

ॲडलेड टेस्टपूर्वी टीम इंडियासा आनंदाची बातमी आलीये. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात न्यूझीलंडच्या पराभवामुळे भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलचं समीकरण काहीसं सोपं झालं आहे.

पर्थ टेस्ट सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला WTC फायनलमध्ये सहज पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-0 असा विजय आवश्यक होता. पण आता ते 3-0 ने सिरीज जिंकून देखील फायनल गाठता येणार आहे. त्यामुळे आता बॉर्डर गावस्कर सिरीजमधील चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकण्यावर टीम इंडियाचा भर असणार आहे.

WTC Points Table
Rohit Sharma: टीम इंडियासाठी रोहित शर्माचा मोठा त्याग? 6 वर्षांनंतर पाहायला मिळणार 'हा' बदल

फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाची समीकरण कशी?

1. जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट सिरीज 3-0, 4-0, 4-1 किंवा 5-0 अशा फरकाने जिंकली तर भात निश्चितपणे WTC फायनलमध्ये पोहोचेल.

2. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 ने सिरीज जिंकल्यासही टीम इंडियाला संधी आहे. पण त्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावं लागण्याची आशा ठेवावी लागेल.

WTC Points Table
Rohit Sharma: टीम इंडियासाठी रोहित शर्माचा मोठा त्याग? 6 वर्षांनंतर पाहायला मिळणार 'हा' बदल

3. ऑस्ट्रेलियाविरुद्धची सिरीज ३-२ अशा फरकाने जिंकली तरी भारताला फायनल गाठण्याची संधी आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट श्रीलंकेने किमान एक सामना अनिर्णित राखावा लागणार आहे.

4. ऑस्ट्रेलियासोबतची सिरीज 2-2 अशी बरोबरीत असली तरीही भारतासाठी काही संधी असणार आहेत. अशा परिस्थितीत जर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला दुसऱ्या टेस्टमध्ये पराभूत केलं आणि श्रीलंकेची टीम ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट सिरीज जिंकण्यात यशस्वी ठरली, तर भारताचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होणार आहे.

WTC Points Table
Rohit sharma: भर सामन्यात रोहित शर्माने सरफराजवर उगारला हात; पाहा मॅचदरम्यान असं काय घडलं?

सध्या पॉईंट्स टेबलवर टीम इंडिया अग्रस्थानी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये टीम इंडियाचे आतापर्यंत 15 सामन्यांत 9 विजय, 5 पराभव आणि एक बरोबरीत 110 पॉईंट्स आहेत. त्याच्या गुणांची टक्केवारी ६१.११ टक्के आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका WTC टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे 9 सामन्यांत 5 विजय, 3 पराभव आणि एक बरोबरीत 64 गुण आहेत. त्याच्या गुणांची टक्केवारी ५९.२६ आहे.

WTC Points Table
Rohit sharma: भर सामन्यात रोहित शर्माने सरफराजवर उगारला हात; पाहा मॅचदरम्यान असं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com