
क्रिकेटमधील अनेक खेळाडूंची दोस्ती-यारी तुम्हाला माहिती असेल. यातीलच एक नाव म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या मैत्रीचे किस्से गाजले आहेत. नुकतंच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यानंतर सचिन तेंडुलकरला ट्रोल करण्यात येतंय.
विनोद कांबळी आज 52 वर्षांचे आहेत. मात्र त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती पूर्णपणे फीट नसल्याचं म्हटलं जातं. ३ डिसेंबर रोजी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती.
रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं अनावरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी सरांच्या सर्व शिष्यांना बोलवण्यात आलं होतं. या ठिकाणी मास्टर ब्लास्टर सचिनने विनोद कांबळी यांची भेट घेतली.
या कार्यक्रमासाठी सचिन व्यासपीठावर उपस्थित होता आणि थोड्यावेळाने विनोद कांबळी देखील त्या ठिकाणी आला. विनोद उजव्या बाजूच्या कोपऱ्यात बसला होता. यावेळी सचिन स्वत:हून त्याला भेटण्यासाठी आला. सचिन भेटायला आल्यावर विनोदने त्याचा हात जोरात पकडला. यावेळी विनोद सचिनचा हात सोडायला तयार नव्हता आणि त्याला तिथेच थांबण्यासाठी सांगत होता.
मात्र कार्यक्रमाची वेळ झाली असल्याने सर्वांना त्यांच्या जागेवर जायचं होतं. त्यामुळे सचिनला आपल्या जागेवर जावं लागलं. त्यामुळे सचिन आपल्या जागेवर जाण्यासाठी निघाला. पण विनोद सचिनला सोडतच नव्हता. त्यावेळी बाजूला असलेल्या व्यक्तीने सचिनला सांगितलं ती, तू तुझ्या जागेवर जा, मी विनोदला बघतो. त्यानंतर त्या व्यक्तीने विनोदला, मी तुझ्याबरोबर आहे असंही सांगितलं.
एक वेळ अशी होती जेव्हा सचिन आणि विनोद चांगले मित्र होते. सचिनकडे आता पैसा आणि प्रसिद्धी आहे. मात्र असं असूनही सचिन विनोदसारख्या जवळच्या मित्राला मदत करत नाही, असं सोशल मीडियावर म्हटलं जातंय. परंतु सचिनने आतापर्यंत विनोदला बरीच मदत केल्याचं समोर आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.