Yashasvi Jaiswal saam tv
Sports

Cricket News: अजिंक्य रहाणेच्या किट बॅगला लाथ, वरिष्ठ खेळाडूंशी वाद आणि...! यशस्वी जयस्वालने मुंबई सोडण्याचं खरं कारण काय? रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी

Cricketer Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालने मुंबईच्या टीमला रामराम म्हटल्यानंतर त्याच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. यावेळी एका रिपोर्टमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनवर असलेल्या नाराजीमुळे त्याने हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जातंय.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल सुरु असतानाच यशस्वी जयस्वालने अचानक एक मोठा निर्णय घेतला. यावेळी जयस्वाल मुंबई सोडून गोव्याकडून खेळणार आहे. बुधवारी हा निर्णय चांगलाच चर्चेत आला. जयस्वालने मंगळवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहिलं आहे. त्याने मुंबई सोडून गोव्याकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केलीये. गव्हर्निंग बॉडीने तात्काळ त्याची विनंती मान्य केली.

जयस्वालच्या निर्णयाने खळबळ

यशस्वी जयस्वालने मुंबईहून गोव्यात जाण्याच्या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडालीये. 23 वर्षीय यशस्वी आता गोव्याच्या टीमकडून खेळणार आहे. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याचा मुद्दा मान्य केला आहे. यावेळी त्याला गोव्याच्या टीमचं कर्णधारपदंही दिलं जाऊ शकतं.

एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना जयस्वाल म्हणाला की, गोव्यात मला नव्या संधी मिळतील. मुंबईने मला खूप काही दिलंय त्यामुळे मी एमसीएचा नेहमीच आभारी राहणार आहे. मात्र समोर आलेल्या रिपोर्टमध्ये काही वेगळंच समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, जयस्वाल मुंबईत सातत्याने सुरू असलेल्या तपासावर खूश नव्हता.

काय म्हणाला जयस्वाल?

जयस्वाल म्हणाला की, "हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. आज मी जे काही आहे ते मुंबईमुळेच आहे. या शहराने मला घडवलंय आणि मी आयुष्यभर एमसीएचा ऋणी राहीन. गोव्याने मला नवी संधी दिली असून नेतृत्वाची संधी दिली आहे. माझं पहिलं ध्येय भारतासाठी चांगली कामगिरी करणं असणार आहे. मी गोव्याकडून खेळेन आणि त्यांना स्पर्धेत पुढे नेण्याचा प्रयत्न करेन.

रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, जयस्वाल मुंबईमध्ये सातत्याने होत असलेल्या चौकशीमुळे नाराज होता. याशिवाय जयस्वाल आणि अजिंक्य रहाणे यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याचं या अहवालात म्हटलंय. अजिंक्य रहाणे हा मुंबईच्या प्रथम श्रेणी संघाचा कर्णधार आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये 2022 पासून बिनसलं असल्याची माहिती आहे. रहाणेने जयस्वालला स्लेजिंगसाठी मैदानाबाहेर पाठवले होतं. जयस्वालने त्या सामन्यात २६५ रन्स केले होते. पण रहाणेला त्याची स्लेजिंग आवडली नाही. रिपोर्टनुसार, रागाच्या भरात जयस्वालने रहाणेच्या किटबॅगलाही लाथ मारली होती.

रिपोर्टमध्ये जयस्वालवर अनेक आरोप

या रिपोर्टमध्ये जयस्वालच्या शॉट सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. मुंबई विरुद्ध जम्मू-काश्मीर सामन्यातील खराब कामगिरीनंतर टीम मॅनेजमेंटने त्याच्यावर टीका केली होती. मुंबईचे प्रशिक्षक ओंकार साळवी आणि रहाणे यांनी जयस्वालवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान पीटीआयच्या अहवालातही याचाच उल्लेख करण्यात आला आहे. जयस्वाल यांचा एका वरिष्ठ खेळाडूशी वाद झाला होता, असं या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान यामुळेच जयस्वालने गोव्यात जाण्याचा निर्णय मुंबई टीम मॅनेजममेंटशी असलेल्या नाराजीमुळेच घेतला असावा, असंही मानलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी, २५०० पदांसाठी भरती, पगार ८५००० रुपये; आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT