virat kohli with rajat patidar saam tv
Sports

RCB Captaincy: ...म्हणून विराटऐवजी रजत पाटीदारला RCB चा कर्णधार बनवलं; हे कारण तुम्हाला माहितच नसेल

RCB Captaincy, IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने रजत पाटीदारला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला. काय आहे कारण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या हंगामात फाफ डू प्लेसिस या संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.

मात्र आगामी हंगामापूर्वी ही जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली. कर्णधारपदाची खूर्ची रिकामी झाल्यानंतर, ही जबाबदारी पुन्हा एकदा विराट कोहलीकडे सोपवली जाणार, असं म्हटलं जात होतं. मात्र असं काहीच झालं नाही. विराट कोहलीकडे ही जबाबदारी का सोपवली गेली नाही, याबाबत जितेश शर्माने खुलासा केला आहे.

काय म्हणाला जितेश शर्मा?

जितेश शर्माच्या मते, विराटने स्वत: ही ऑफर नाकारली. त्यामुळे रजत पाटीदारकडे ही जबाबदारी सोपवली गेली. जितेश म्हणाला, ' निश्चितच रजत पाटीदारला कर्णधारपद मिळायला हवं. त्याने गेली काही वर्ष या संघासाठी बहुमूल्य योगदान दिलं आहे. मला रजत पाटीदारसोबत खेळण्याचा अनुभव आहे. मी निश्चितच रजत पाटीदारला मदत करेल.' रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या कर्णधारपदासाठी जितेश शर्माच्या नावाचीही जोरदार चर्चा होती. मात्र ही जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली.

जितेश शर्मा गेल्या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळताना दिसून आला होता. मात्र आगामी हंगामापूर्वी त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या मेगा लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्याला ११ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं.

या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये जितेश शर्माला संघात घेण्यासाठी जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. शेवटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने बाजी मारली आणि ११ कोटीत त्याला आपल्या संघात घेतलं. जितेश शर्माबद्दल बोलायचं झालं, तर तो फिनिशर म्हणून ओळखला जातो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला अशाच एका खेळाडूची गरज होती, तो शेवटी फलंदाजीला येऊन जलद गतीने धावा करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

SCROLL FOR NEXT