team india twitter/bcci
क्रीडा

IND vs SL, 1st ODI: ...म्हणून भारतीय खेळाडूंनी हातावर बांधली काळ्या रंगाची पट्टी; जाणून घ्या कारण

Black Arm Band On Indian Players Hand: भारतीय खेळाडू पहिल्या वनडे सामन्यात हातावर काळ्या रंगाची पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. काय आहे कारण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

टी-२० मालिकेत श्रीलंकेचा सुपडा साफ केल्यानंतर भारतीय संघ वनडेत श्रीलंकेला आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय खेळाडू, माजी भारतीय खेळाडू अंशुमन गायकवाड यांना श्रंद्धाजली वाहण्यासाठी काळ्या रंगाची पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत.

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे ३१ जुलै रोजी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या जाण्याने भारतीय क्रिकेटमध्ये शोककळा पसरली. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय खेळाडू श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात काळ्या रंगाची पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत.

संघातील प्रमुख खेळाडूंचं कमबॅक

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेत भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंनी कमबॅक केलं आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि श्रेयस अय्यर हे खेळाडू वनडे क्रिकेटपासून दुर होते. या खेळाडूंनी १० महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारतीय वनडे संघात कमबॅक केलं आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे खेळाडू केवळ वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसून येणार आहेत.

भारत श्रीलंका पहिल्या वनडेसाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल,मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग,

श्रीलंका: चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, अकिला धनंजया, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे,

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

SCROLL FOR NEXT