rohit sharma twitter
Sports

IND vs AUS, Rohit Sharma: रोहित शर्माला प्लेइंग ११ मधून बाहेर का केलंय? जसप्रीत बुमराहने सांगितलं खरं कारण

Jasprit Bumrah On Rohit Sharma: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यातून रोहित शर्माला वगळण्यात आलं आहे. दरम्यान त्याला बाहेर बसवण्याचं नेमकं कारण काय?

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला आहे. तर आऊट ऑफ फॉर्म असलेला कर्णधार रोहित शर्मा या सामन्यातून बाहेर आहे.

या सामन्याच्या एक दिवसापूर्वीच चित्र स्पष्ट झालं होतं की, रोहित शर्माला या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाणार नाही. नाणेफेकीवेळी कर्णधार रोहित शर्माऐवजी जसप्रीत बुमराह नाणेफेकीसाठी मैदानात आला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Why rohit sharma not playing?

रोहित शर्माला या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान नाणेफेक झाल्यानंतर बुमराहने यामागचं खरं कारण सांगितलं आहे. ' आमच्या कर्णधाराने या सामन्यात विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यावरून हे सिद्ध होतंय की, आम्ही एकजूट आहेत. कुठलाही स्वार्थ नसून जे संघाच्या हितासाठी आहे तेच आम्ही करू. आज आम्ही संघात दोन बदल केले आहेत. रोहितने विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आकाश दीप दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.'

Rohit sharma flop show in border gavaskar trophy

या मालिकेतील ३ सामन्यांमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. तो वैयक्तिक कारणास्तव पहिल्या कसोटीत खेळताना दिसून आला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतून तो संघासोबत जोडला गेला. मालिकेतील ३ सामन्यांमध्ये त्याला अवघ्या ३१ धावा करता आल्या आहेत.

त्याने ३,६,१०,३ आणि ९ धावा केल्या आहेत. टॉप ऑर्डरची फ्लॉप सुरुवात हे भारतीय संघाच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं. त्यामुळे रोहितने स्वतः माघार घेत विश्रांतीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. मालिका बरोबरीत आणण्यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीनेही हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Krantijyoti Vidyalay Collection : 'क्रांतीज्योती विद्यालय...' बॉक्स ऑफिसवर सुसाट, अमेय वाघच्या चित्रपटानं आठवड्याभरात कमावले तब्बल 'इतके' कोटी

BP चा त्रास होईल कमी; आत्ताच 'या' ४ सवयी करा फॉलो, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंगला झाला 'हा' गंभीर आजार; मुलाने भावूक होऊन केला खुलासा

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

SCROLL FOR NEXT