arjun tendulkar saam tv
Sports

Arjun Tendulkar IPL 2023: अर्जुनचं मुंबई संघात कमबॅक करणं कठीण! रोहित 'या' कारणामुळे ठेवतोय संघाबाहेर

Will Arjun Tendulkar Play Today: रोहित शर्मा अर्जुन तेंडुलकरला संधी का देत नाहीये? काय आहे कारण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

LSG VS MI, IPL 2023: मुंबई इंडियन्स संघाने या हंगामात दमदार पुनरागमन केलं आहे. असं असलं तरीदेखील गोष्टी मुंबई इंडियन्स संघाच्या बाजूने जाताना दिसून येत नाहीये. मुंबईला या हंगामात मोठे धक्के बसले आहेत. बुमराह, रिचर्डसन नंतर जोफ्रा आर्चर स्पर्धेतून बाहेर झाला.

रोहित शर्माचा फॉर्म आणि २०० धावा खर्च करत असलेल्या गोलंदाजांनी देखील मुंबई इंडियन्सच्या चिंतेत भर घातली आहे. प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या मुंबई इंडियन्स संघासाठी आज लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्धचा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.

दरम्यान रोहित शर्मा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) का संधी देत नाहीये? काय आहे कारण? जाणून घ्या.

अर्जुनला संधी मिळत नसल्याने क्रिकेट चाहत्यांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेतील २२ व्या सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली होती. ४ सामन्यांमध्ये त्याने डावाची सुरुवात करून दिली होती.

यादरम्यान त्याने ३ विकेट्स देखील घेतल्या होत्या. मात्र पंजाब विरुध्द झालेल्या सामन्यात सॅम करन हरप्रित भाटियाने त्याला ३१ धावा ठोकल्या. त्यानंतर त्याच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली.

अर्जुन बाहेर होण्याचं कारण काय?

शेवटच्या सामन्यात जेव्हा गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघ आमने सामने आले होते. त्यावेळी रोहित शर्माने त्याला गोलंदाजी करण्याची संधी दिली होती. या सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. २ षटकात ९ धावा खर्च करत त्याने १ विकेट घेतली होती. मात्र एकाच षटकात ३१ धावा खर्च केल्यानंतर अर्जुनला संघात संधी मिळाली नाही. तो सलग ४ सामने संघाबाहेर राहिला आहे. अर्जुनला संधी न मिळण्याचं प्रमुख कारण म्हणजे अर्शद खान आणि माधवालसारखे गोलंदाज चांगली कामगिरी करून विकेट्स काढून देत आहेत. (Latest sports updates)

अर्शद आणि माधवालपेक्षा अर्जुनची इकोनॉमी चांगली...

जर आकडेवारी पाहिली तर अर्जुनची इकोनॉमी ही अर्शद आणि माधवालपेक्षा चांगली आहे. गेल्या ३ सामन्यांमध्ये अर्शदने १३ च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या आहेत. तर आकाशने १० च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या आहेत.

तर अर्जुनच्या इकोनॉमीबद्दल बोलायचं झालं तर, अर्जुनने ९ च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या आहेत. आज लखनऊ विरुध्द होणाऱ्या सामन्यात त्याला संधी मिळणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

SCROLL FOR NEXT